शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

ममतांना दिवसभरात दुसरा धक्का, तृणमूलला सोडचिठ्ठी देत आमदाराचा भाजपात प्रवेश

By बाळकृष्ण परब | Published: November 27, 2020 8:20 PM

BJP News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला.

ठळक मुद्देआमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केलाभाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीमध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारलेमिहीर गोस्वामी यांनी काही दिवस आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला. आज दुपारी नाराज असलेले मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असतानाच संध्याकाळी आमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीमध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.टीएमसीचे नेते असलेले मिहीर गोस्वामी यांनी काही दिवस आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमधील कुचबिहार विधानसभा मतदारसंघातील टीएमसीचे खासदार असलेले मिहीर गोस्वामी हे शुक्रवारी भाजपा खासदार निशित प्रामाणिक यांच्यासोबत नवी दिल्लीसाठी रवाना झाले होते. तेव्हापासूनच ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान, शुभेंदू अधिकारी यांनी गुरुवारी हुगळी रिव्हर ब्रिज कमिशनमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी