शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

लक्षद्वीपमधील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली, स्वतंत्र महामंडळाचीही स्थापना होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 3:05 AM

बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे.लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेटसमूहांतील २६ बेटांना समन्वित विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असून, त्यासाठी गेल्या जूनमध्ये ‘आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी’ही स्थापन केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लक्षद्वीपमधील १२ नव्या बेटांचा विकास होणार आहे.लक्षद्वीप हा २९ लहान-मोठ्या बेटांचा समूह आहे. त्यापैकी निम्म्या बेटांवर आदिम जमातींची वस्ती आहे. लक्षद्वीपचे प्रशासक फारुक खान यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटनासाठी खुल्या केल्या जायच्या १२ पैकी १० बेटांवर प्रथम काम सुरू होईल. पहिल्या टप्प्यात तेथे पर्यटकांसाठी सुमारे १५० निवासी खोल्यांची सोय केली जाईल. हे काम खासगी विकासकांच्या मदतीने केले जाईल. त्यासाठी विकासक, हॉटेल व्यावसायिक व सहल आयोजकांची परिषद भरविण्यात येईल.मिनिकॉय, कदमाट, अगाट्टी, चेतलाट, बित्रा, बंगाराम, तिनाकार्रा, चेरियन, सुहेली व कल्पेनी या १० बेटांवर पहिल्या टप्प्यात काम सुरू होईल. यापैकी ८४ निवासी खोल्या आधीपासून वस्ती असलेल्या बंगाराम व सुहेली या बेटांवर बांधल्या जातील. येथे खोलीचे एका रात्रीचे १५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे ही नवी सोय सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नसेल. सध्या लक्षद्वीपमध्ये अगाट्टी येथे विमानतळ आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून हवाई दलाच्या मदतीने मिनिकॉय बेटावरही विमानतळ बांधण्याची योजना आहे. जेथे ‘सी प्लेन्स’ उतरू शकतील, अशी ‘लगून्स’ही निवडली जातील.>नाजूक पर्यावरण जपणारलक्षद्वीप उष्ण कटिबंधातील जगातील एक सर्वोत्तम प्रवाळ द्वीपसमूह म्हणून ओळखला जातो. पर्यटनामुळे तेथील पर्यावरणाचे नाजूक संतुलन बिघडू नये यासाठी काळजी घेतली जाईल. पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवली जाईल. प्रत्येक हॉटेल व रिसॉर्टला विजेची सर्व गरज सौरऊर्जेने भागविणे, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे आणि पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ संयंत्रे बसविणे सक्तीचे केले जाईल. ज्या बेटांवर वस्ती आहे, तेथे आदिम जमातींची संस्कृती जपण्यासाठी पर्यटकांच्या फिरण्यावर मर्यादा घातल्या जातील.