उरुळीकांचन ग्रामपंचायत निवडणूक २०१५ आरक्षण सोडत जाहीर

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30

उरुळीकांचन : काल अर्धवट स्वरूपात तहकूब झालेली आरक्षण सोडत बैठक आजही अभूतपूर्व गोंधळात व पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात पार पडली. उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी १७ जागांचे आरक्षण ६ प्रभागांमध्ये कसे असेल, याबाबतची सोडत काढण्यासाठीची बैठक आज दुपारी २ वाजता गावच्या राम मंदिरात घेण्यात आली व त्यामध्ये आरक्षण प्रक्रिया अतिशय गोंधळात शासकीय अधिकार्‍यांनी पार पाडली.

Announcing the release of the reservation for the elections of the Urmilkanchan Gram Panchayat | उरुळीकांचन ग्रामपंचायत निवडणूक २०१५ आरक्षण सोडत जाहीर

उरुळीकांचन ग्रामपंचायत निवडणूक २०१५ आरक्षण सोडत जाहीर

ुळीकांचन : काल अर्धवट स्वरूपात तहकूब झालेली आरक्षण सोडत बैठक आजही अभूतपूर्व गोंधळात व पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात पार पडली. उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी १७ जागांचे आरक्षण ६ प्रभागांमध्ये कसे असेल, याबाबतची सोडत काढण्यासाठीची बैठक आज दुपारी २ वाजता गावच्या राम मंदिरात घेण्यात आली व त्यामध्ये आरक्षण प्रक्रिया अतिशय गोंधळात शासकीय अधिकार्‍यांनी पार पाडली.
या बैठकीतला जि.प.सदस्य अशोक कसबे, पं.स. सदस्य काळूराम मेमाणे, सरपंच दत्तात्रय कांचन, ग्रा.पं. सदस्य सुनील कांचन, संतोष कांचन, युवराज कांचन, मारुती कांचन, सुनील दीक्षित, धनराज टिळेकर, संजय बडेकर, सचिन बडेकर, सारिका लोणारी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देविदास कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब पुते, भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जगताप, आदीसह निवडणुकीचे इच्छुक बहुसंख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीची बैठक मंडल अधिकारी हरिदास चाटे, किशोर शिंगोटे, तलाठी डुंबरे व ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी पार पाडली.
या आरक्षण सोडतीमध्ये विद्यमान उपसरपंच संगीता लोंढे व सदस्य संतोष कांचन यांची संधी हुकली, तर विद्यमान सरपंच दत्तात्रय कांचन आणि सदस्य सुनील कांचन, युवराज कांचन, मारुती कांचन यांना पुन्हा लढण्याची संधी मिळाली आहे.
प्रभाग व त्यातील आरक्षण पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्र. १ : डाळिंब रस्ता ते चौधरी वस्ती, पुरंदर सोसायटी काळेवाडा जागा ३.
आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण पुरुष.
प्रभाग क्र. २ : गणराज हॉस्पिटल आश्रम रोड ते रेल्वे पी.डब्ल्यू आय. बंगला राज हाईट्स ते राहूकर इमारत जागा २
आरक्षण : सर्वसाधारण पुरुष नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
प्रभाग क्र. ३ : दत्तवाडी बगाडे मळा रस्ता परिसर जागा ३
आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष.
प्रभाग क्र. ४ : दातार कॉलनी ते गावठाण जागा ३
आरक्षण : नागरिकांचा मागास वर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण पुरुष.
प्रभाग क्र. ५ : बडेकरनगर ते श्रीकृष्ण मंदिर परिसर जागा ३
आरक्षण : अनुसूचित जाती स्त्री २ व नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष.
प्रभाग क्र. ६ : तुपे वस्ती ते पांढरस्थळ वस्ती जागा ३
आरक्षण : अनुसूचित जाती पुरुष सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण पुरुष.
या आरक्षणाने नाराज असलेली मंडळी अपिलात जाण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: Announcing the release of the reservation for the elections of the Urmilkanchan Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.