शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 09:07 IST

दक्षिणेत सामर्थ्य वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या घोषणेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय लाभ मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप प्रबळ नाही तिथे भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेमुळे मतदारांचे लक्ष या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. 

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याने आंध्र प्रदेशमध्ये भाजपच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्या राज्यात भाजपला मतदारांचा फारसा पाठिंबा मिळालेला नाही. तसेच तेलंगणातही राजकीय फायदा होणार आहे. चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून मोदी सरकारने राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरींचे मन जिंकले आहे. ते चौधरी चरणसिंहांचे नातू आहेत. जाट आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा जयंत चौधरींना आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिल्यामुळे तामिळनाडू व दक्षिण भारतातील अन्य राज्यांत भाजपला आणखी अधिक शिरकाव करता येईल, असा त्या पक्षाचा विचार असल्याचे कळते.

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह

शेतकरी कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य केले समर्पितमाजी पंतप्रधान चाैधरी चरणसिंह हे शेतकरी नेते म्हणूनच ओळखले जातात. शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले हाेते. त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात याेगदान हाेते. १९२९मध्ये त्यांना इंग्रजांनी तुरुंगातही टाकले हाेते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावलांवर पाऊल ठेवले. 

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव

राजकीय ‘विद्वान’ : आर्थिक उदारीकरणाचे जनक सलग आठ वेळा लाेकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि काॅंग्रेस पक्षात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांना १७ भाषा अवगत हाेत्या. ६० वर्षांच्या वयातही त्यांनी संगणक प्राेग्रॅमिंगच्या २ भाषा शिकल्या हाेत्या. नरसिंह राव यांचे महाराष्ट्राशी घनिष्ट संबंध हाेते.

कृषितज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन

देशाच्या कृषिक्रांतीचे जनक; संशाेधनासाठी वाहिले आयुष्यस्वातंत्र्यानंतर देशामध्ये अन्नधान्याची टंचाई असतना डाॅ. स्वामिनाथन यांनी महत्त्वपूर्ण संशाेधन करुन कृषिक्रांती घडविली. त्यांनी जास्त उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित केले हाेते. याशिवाय तांदुळवरही त्यांनी संशाेधन केले. बंगालच्या दुष्काळामुळे व्यथित झालेले स्वामीनाथन यांनी संपूर्ण आयुष्य कृषी संशाेधनासाठी वाहिले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBharat Ratnaभारतरत्नFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश