ंमनसेची कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार
By Admin | Updated: April 5, 2015 00:55 IST2015-04-04T01:55:07+5:302015-04-05T00:55:06+5:30
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांचे लवकरच मेळावे घेण्यात येईल, असे पदाधिकार्यांनी जाहीर केले.

ंमनसेची कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांचे लवकरच मेळावे घेण्यात येईल, असे पदाधिकार्यांनी जाहीर केले.
राजगड येथे शुक्रवारी झालेल्या या बैठकीत महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे आणि शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी कार्यकर्त्यांसमोर मनोगत व्यक्त केले. राज ठाकरे यांनी नुकताच नाशिक दौरा केला, त्यानुसार आता कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन नवीन कार्यकारिणी निवडण्यात येेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात पक्ष संघटन वाढविण्यासाठी नवीन शाखा व शाखा नूतनीकरण करण्यात येईल, असे सांगून कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरात महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम साजरे करावे, असे आवाहन या पदाधिकार्यांनी केले. यावेळी अन्य पदाधिकार्यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संदीप लेनकर, अनिल मटाले, यशवंत निकुळे, गणेश चव्हाण, विजय ओहोळ, संपतराव जाधव, नितीन साळवे, विक्रम कदम, रवींद्र जाधव, मनोहर काळे आदिंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.