झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास अण्णांचा नकार धमकी पत्र : दुष्काळात सुरक्षेवर खर्च कशाला?

By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30

पारनेर (अहमदनगर) : मरण तळहातावर घेऊनच मी जीवन जगतोय. समाज हितासाठी गोळ्याही झेलायला तयार आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असताना एका व्यक्तीवर सुरक्षेचा खर्च कशासाठी केला जातोय ? मला सुरक्षा नको, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास मुख्यमंत्र्यांशी बोलताना नकार दर्शविला आहे.

Anna's declaration threatened to get Z-level security: Letter to security in drought? | झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास अण्णांचा नकार धमकी पत्र : दुष्काळात सुरक्षेवर खर्च कशाला?

झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास अण्णांचा नकार धमकी पत्र : दुष्काळात सुरक्षेवर खर्च कशाला?

रनेर (अहमदनगर) : मरण तळहातावर घेऊनच मी जीवन जगतोय. समाज हितासाठी गोळ्याही झेलायला तयार आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असताना एका व्यक्तीवर सुरक्षेचा खर्च कशासाठी केला जातोय ? मला सुरक्षा नको, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास मुख्यमंत्र्यांशी बोलताना नकार दर्शविला आहे.
अण्णा हजारे यांना गुरुवारी दुपारी पुन्हा एक धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांचे सहाय्यक दत्ता आवारी, शाम पठाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गेल्या दोन महिन्यात अण्णांना जीवे मारण्याच्या चार ते पाच वेळा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळीच राज्य सरकारने अण्णांना झेड सुरक्षेबरोबरच त्यांचे कार्यालय व निवासस्थानी आणखी विशेष पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला. अण्णांना त्याची माहिती समजल्यावर त्यांनी सुरक्षा न घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होत नसल्याने ते दुपारपर्यंत अस्वस्थ होते.
सूत्रांच्या माहितीनुसार दुपारी शिरुरचा कार्यक्रम झाल्यानंतर अण्णांचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला. तेव्हा अण्णांनी झेड सुरक्षा स्वीकारावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पण, अण्णांनी माझ्या सुरक्षेपेक्षा दुष्काळी परिस्थितीवर लक्ष देऊन तिकडे पैसा खर्च करा, असेही सांगितल्याचे समजते. त्यावर, आम्हाला तुमच्या विचारांची गरज असून तुमचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्याचे समजते. गुप्त वार्ता विभागाच्या अधिकार्‍यांसह पारनेरचे पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी अण्णांच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)
----------
विखे आज राळेगणमध्ये
अण्णा हजारे यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे शनिवारी सकाळी राळेगणसिद्धीत येऊन अण्णांना भेटणार असल्याची माहिती राहुल झावरे यांनी दिली आहे.
-----------------
दोन दिवसांत पथक येणार
अण्णांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असला तरी दोन दिवसांत पथकातील पोलीस व अधिकारी राळेगणसिद्धीत दाखल होणार आहेत. त्यांच्या दिमतीला एक अत्याधुनिक वाहन व इतर पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती आहे.
----------------

Web Title: Anna's declaration threatened to get Z-level security: Letter to security in drought?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.