धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:48 IST2025-05-30T18:47:02+5:302025-05-30T18:48:28+5:30

अंकिता भंडारीची हत्या करणारा सौरभ भास्करला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावेळी तो कोर्टातून हसत हसत बाहेर आला.

Ankita Bhandari's murderer kept smiling even after being sentenced to life imprisonment, even posed for photos | धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली

धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली

अंकिता भंडारीरी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ भास्कर याला आज कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकल्यानंतर तो हसत हसत कोर्टातून बाहेर पडला. यावेळी मीडिया कॅमेरे पाहून तो हिरोसारखा पोज देऊ असल्याचे समोर आले आहे. 

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर येथील वनयंत्र रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी १९ वर्षीय अंकिता भंडारी हिची १८ सप्टेंबर २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. रिसॉर्ट चालवणारा पुलकित आर्य याने त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांच्यासह ही हत्या केली.

‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा

पुलकितचे वडील त्यावेळी भाजप नेते होते आणि राजकीय संबंध जोडल्यानंतर या घटनेवर मोठा गदारोळ झाला होता. २ वर्षे ८ महिने चाललेल्या खटल्यानंतर, कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रीना नेगी यांनी शुक्रवारी तिन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा तिन्ही आरोपी कोर्टरूममध्ये उपस्थित होते. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर तिघांनाही कडक सुरक्षेत तुरुंगात नेण्यात आले. कोर्टातून बाहेर पडल्यानंतर दोषींच्या चेहऱ्यावर कोणताही पाश्चाताप नव्हता, उलट सौरभ भास्कर हसताना दिसला. काळी टोपी घालून, सौरभ कॅमेऱ्यांकडे पाहत हसत राहिला आणि नंतर हात वर करून पोज देऊ लागला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Web Title: Ankita Bhandari's murderer kept smiling even after being sentenced to life imprisonment, even posed for photos