पशूप्रदर्शनाने भोकरच्या यात्रेला सुरुवात
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
भोकर : येथील महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेल्या यात्रेची सुरुवात पशू प्रदर्शनाने करण्यात आली़ या पशूप्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले़

पशूप्रदर्शनाने भोकरच्या यात्रेला सुरुवात
भ कर : येथील महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेल्या यात्रेची सुरुवात पशू प्रदर्शनाने करण्यात आली़ या पशूप्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले़या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक गोपाळ रांजनकर, नागनाथ घिसेवाड, सुभाष पा़किन्हाळकर, पांचाळ आदींची उपस्थिती होती़ यावेळी पशूचे सहा गट पाडण्यात आले़ गोरे गटमधून ज्ञानेश्वर सांगळे (रा़बामणी) प्रथम, तोलबा कदम -द्वितीय तर भूजंगराव वरने (रा़भोकर) यांच्या गोर्याला तृतीय बक्षीस देण्यात आले़ वासरू गटामधून प्रथम बालाजी कंेद्रे-भोकर, द्वितीय व्यंकटी चिलीमवाड-भोकर, तृतीय राजेश्वर सोनमनकऱ बैलजोडी गटातून प्रथम केशव सोळंके-पोमनाळा, द्वितीय भाऊराव जाधव-हस्सापूर, तृतीय राजू बुटनवाड-रायखोड़ लालकंधारी गाय गटामधून प्रथम गोविंद शेटे-भोकर, द्वितीय विश्वनाथ तुरटवाड-शिंगारवाडी, तृतीय कोंडीबा आरणवाड़ संकरीत गाय गटामधून प्रथम खाजा तोफीक इनामदार-भोकर, द्वितीय संतोष मुत्येपवाड, तृतीय-गोविंद शेटे, कालवड गटातून प्रथम राजू कापसे-बटाळा, द्वितीय शंकर जंगेवाड-शिंगारवाडी, तृतीय बक्षीस बाळू जंगेवाड यांना देण्यात आले़पशूप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशूधन विकास अधिकारी डॉ़अविनाश बुन्नावार, डॉ़लालू कंधारे, डॉ़उत्तम बोजमवाड, डॉ़प्रकाश हाके, डॉ़शंकर उदगिरे, डॉ़शिवाजी धुमाळे यांनी काम पाहिले़