शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

नाराज पोलिसांचा राजनाथ सिंह यांना 'सॅल्यूट' करण्यास नकार, कारवाईची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 10:51 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहायचं होतं. मात्र कॉन्स्टेबल अनुपस्थित राहिल्याने दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडली.

ठळक मुद्देपगारात होणा-या कपातीच्या विरोधात राजस्थान पोलीस दलातील जवळपास 250 कॉन्स्टेबल एक दिवसाच्या सुट्टीवरकाही कॉन्स्टेबल्सना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहायचं होतंकॉन्स्टेबल अनुपस्थित राहिल्याने दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडली

जयपूर - पगारात होणा-या कपातीच्या विरोधात राजस्थान पोलीस दलातील जवळपास 250 कॉन्स्टेबल एक दिवसाच्या सुट्टीवर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामधील काही कॉन्स्टेबल्सना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहायचं होतं. मात्र कॉन्स्टेबल अनुपस्थित राहिल्याने दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडली. अधिकारी मात्र पगारातील कपात ही अफवा असल्याचा दावा करत आहेत. 

जोधपूर पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, 'जवळपास 250 हून जास्त पोलीस कर्मचारी सोमवारी सामूहिक रजेवर गेले होते. सुट्टी मंजूर झाली नसतानाही हे कर्मचारी सुट्टीवर गेले. यामधील काहीजणांना राजनाथ सिंह यांना सलामी देण्याची ड्यूटी लावण्यात आली होती. मात्र त्यांनी येण्यास नकार दिला. अखेर आम्हाला नाईलाजाने दुस-या पोलीस कर्मचा-यांकडून सलामी द्यावी लागली. 

अशोक राठोड यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'हा गंभीर मुद्दा आहे, आणि दोषींविरोधात कारवाई केली जाईल'. दुसरीकडे राजस्थानचे डीजीपी अजित सिंह यांनी सांगितलं आहे की, 'अशा प्रकारचा बेशिस्तपणा स्विकारला जाणार नाही. हे कर्मचारी पगारात होणा-या कपातीच्या अफवेनंतर निदर्शन करत आहेत'. सध्या या कर्मचा-यांचा पगार महिना 24 हजार रुपये असून, राज्य सरकार कपात करत 19 हजार करणार असल्याची माहिती आहे.

डीजीपी अजित सिंह यांनी सोमवारी पोलीस महाअधिक्षक आणि जिल्हा अधिक्षकांना पत्र लिहून निदर्शन करणा-या कर्मचा-यांसोबत चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. 

मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं. रमेश शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून शनिवारी त्याला निलंबन करण्यात आल्याचं समजतय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून रमेश शिंदे हे कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.

दुसरीकडे आसाममध्ये प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणा-या सीआरपीएफ जवानाला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठीडत पाठवण्यात आलं आहे. पंकज मिश्रा असं त्याचं नाव असून, रविवारी त्याला अटक करण्यात आली होती.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPoliceपोलिसRajasthanराजस्थान