शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:47 IST

एका कारमधून आलेल्या दोन तरुणांना पोलिसांना अडवल्याने, त्यांनी ताजमहलच्या परिसरात गोळीबार केला.

सोमवारी सकाळी ताजमहालच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ थरारक घटना घडली. एका एर्टिगा कारमधून आलेल्या दोन तरुणांना पोलिसांना अडवल्याने, त्यांनी हवेत तीन राऊंड गोळीबार केला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरूद टीला येथील पोलीस बॅरियरजवळ एक कार प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला.

सकाळी ९ वाजताच्या सुमारास, यूपी ८५ क्रमांकाची एक कार सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारमधील तरुणांनी प्रथम कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी गाडी वळवली आणि काही अंतरावर जाऊन हवेत तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने घटनास्थळी उपस्थित पर्यटक आणि स्थानिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. गोळीबारानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.

आरोपींची ओळख पटवलीया घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, कारच्या नंबरवरून आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. मथुरा पोलिसांशी संपर्क साधून आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!या घटनेमुळे ताजमहालसारख्या जगप्रसिद्ध आणि संवेदनशील ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीसीपी सिटी सोनम कुमार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले. काही सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर असताना मोबाईल फोनमध्ये व्यस्त असतात, ज्यामुळे अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सुरक्षेतील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Taj Mahalताजमहालagra-pcआग्राCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली