शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आंध्र प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई; 200 कोटींच्या 2 लाख किलो गांजाची होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:22 IST

आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा 2 लाख किलोग्राम गांजा जाळून नष्ट केला आहे.

विशाखापट्टनम:आंध्र प्रदेशपोलिसांनी शनिवारी गांजा तस्करीवर केलेल्या एका कारवाईची देशभर चर्चा होत आहे. शनिवारी आंध्र पोलिसांनी तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा 2 लाख किलोग्राम गांजा जाळून नष्ट केला आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी सांगितले की, राज्याच्या किनारी जिल्ह्यांमधून अनेक वर्षांपासून हा गांजा जप्त करण्यात येत होता.

आंध्र पोलिसांनी गांजा जाळण्याच्या या घटनेला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. पोलिसांनी या गांजा जाळण्याच्या ऐतिहासिक घटनेचा व्हिडिओही ट्विट केला आहे. पोलिस अधिकारी मोठ्या थाटामाटात गांजाचा ढीग पेटवत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यासाठी गांजाच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले होते.

अनेक जिल्ह्यात गांजाची लागवडएका मोकळ्या मैदानात गांजाचे अनेक ढीग केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या सर्व गांजाला पेटवण्यासाठी त्यावर लाकंड ठेवली आहेत. तसेच, मैदानात पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित असून ते एकएक करत ढिगाऱ्याला आग लावत आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक गौतम सावंग म्हणाले की, बंदी घातलेले माओवादी ओडिशातील 23 जिल्हे आणि विशाखापट्टणम जिल्ह्यातील 11 मंडळांमध्ये ही गांजाची लागवड करत आहेत.

गांजाविरोधा मोठी कारवाईते पुढे म्हणाले की, ऑपरेशन 'परिवर्तन' अंतर्गत पोलिसांच्या 406 विशेष पथकांनी 11 मंडळांमधील 313 गावांमधील गांजाच्या बागा नष्ट केल्या आहेत. आंध्र-ओडिशा सीमेवर गांजाची लागवड आणि अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीमध्ये विविध राज्यांतील अनेक गट सामील आहेत. याप्रकरणी 1,500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून 577 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिसfireआग