शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

Andhra Pradesh Flood : खाली JCB, वर हेलिकॉप्टर; आंध्र प्रदेशात पुराचं थैमान, 17 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 3:10 PM

पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

आंध्र प्रदेशात संततधार पावसामुळे आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक वाहून गेले आहेत. राज्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. तिरुपती मंदिरातून आलेल्या फोटोंमध्ये शेकडो यात्रेकरू भीषण पुरात अडकलेले दिसत आहेत. तिरुपतीच्या बाहेरील स्वर्णमुखी नदीला पूर आला आहे. येत आलेल्या पुरामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर आणि जेसीबीची मदत घ्यावी लागत आहे. आकाशात हेलिकॉप्टर आणि खाली जेसीबीच्या माध्यमातून लोकांना मदत केली जात आहे.

अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी भागात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे 3 मजली जुनी इमारत कोसळून तीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बचावकार्य सातत्याने सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 4 हून अधिक लोक अडकले आहेत. सर्कल इन्स्पेक्टर सत्यबाबू यांनी ही माहिती दिली आहे.

घाट रस्ता आणि तिरुमला हिल्सवर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. तिरुपतीच्या हद्दीतील स्वर्णमुखी नदीला पूर आला असून जलाशय भरले आहेत. अनेक लोक पुरात अडकल्याचे वृत्त आहे. तीन राज्य परिवहन बसही अडकल्या आहेत आणि 12 जणांना वाचवता आले नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रायलसीमा भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातील चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि अनंतपूर जिल्हे प्रभावित झाले आहेत. गुरुवारपासून पाऊस सुरूच आहे. चेयुरू नदीला पूर आला आहे. अण्णामय्या सिंचन प्रकल्पालाही याचा फटका बसला आहे. परिसरातील मुसळधार पावसामुळे कडप्पा विमानतळही 25 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशfloodपूरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट