नेल्लोर: आंध्र प्रदेशातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी वाळूने भरलेला ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला, ज्यात एकाच कुटुंबातील सात जणांना जागीच आपला जीव गमवावा लागला. सर्व मृत नेल्लोर शहरातील रहिवासी होते आणि आत्मकुर सरकारी रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील संगम मंडलजवळ वाळूने भरलेला ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात एकाच कुटुंबातील १५ वर्षीय मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की, वाहन लॉरीखाली चिरडले गेल्यामुळे मृतदेह ओळख पटवणेही कठीण झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून लगेचच पळून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना शोकग्रस्त कुटुंबांना पूर्ण पाठिंबा आणि मदत देण्याचे निर्देश दिले. चंद्राबाबूंनी अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीदेखील या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले.