शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

...तर संसदेचे संयुक्त अधिवेशन भरवणार

By admin | Updated: December 25, 2014 01:39 IST

सरकारने विमा आणि कोळसा उद्योगाशी निगडीत वटहुकूम काढले असले तरी फेब्रुवारीत होणाऱ्या संसदेच्या आगामी अधिवेशनात त्यांचे

नवी दिल्ली : सरकारने विमा आणि कोळसा उद्योगाशी निगडीत वटहुकूम काढले असले तरी फेब्रुवारीत होणाऱ्या संसदेच्या आगामी अधिवेशनात त्यांचे कायद्यात रूपांतर झाले नाही तर ते संपुष्टात येतील. त्यामुळे त्यावेळीही विरोधकांची आडमुठी भूमिका कायम राहिली तर प्रसंगी संसदेचे संयुक्त अधिवेशन भरवून ते मंजूर करून घेण्याचे संकेतही जेटली यांनी दिले. संसदेतील कोंडी आणि आडमुठेपणा कायमसाठी सुरु राहू शकत नाही, संसदेत नेहमीच्या मार्गाने कायदे करणे शक्य झाले नाही तरी सरकारची निर्णय प्रक्रिया अडून राहू नये यासाठी मार्ग काढण्याची सोय राज्यघटनेत आहे, असे ते म्हणाले.विमा उद्योगाशी संबंधित वटहुकूम हे आर्थिक सुधारणांसाठी सरकारच्या पक्क्या बांधिलकीचे द्योतक आहे. संसदेच्या दोनपैकी एका सभागृहाने आपल्यापुढील विषय निकाली काढण्यास अनिश्चित काळ थांबण्याचे ठरविले तरी हा देश आणखी थांबू शकत नाही, याची ग्वाही गुंतवणुकदारांसह संपूर्ण जगाला यामुळे मिळणार आहे.विमा उद्योगातील थेट परकीय गुंतवणूक सध्याच्या २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मुभा देणाऱ्या विमा सुधारणा कायद्याचे विधेयक लोकसभेने मंजूर केलेले आहे. राज्यसभेच्या प्रवर समितीनेही त्यास रूकार दिला आहे. परंतु गेल्या अधिवेशनाचे राज्यसभेचे शेवटचे सहा दिवस गोंधळामुळे वाया गेल्याने तेथे ते मंजूर होऊ शकले नाही. तसेच कोळसा खाणींच्या लिलावासंबंधीचा वटहुकूम सरकारने याआधी काढला. त्याची जागा घेणाऱ्या कायद्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले, पण राज्यसभेची मंजुरी राहिली आहे. त्यामुळे सरकारला आता हा वटहुकूम पुन्हा काढावा लागणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)