अन् रागाच्या भरात तरुणानं स्वत:ची महागडी कार ढकलली नदीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 17:09 IST2019-08-09T17:08:54+5:302019-08-09T17:09:55+5:30
हरियाणातील यमुनानगर गावातील एका युवकाने रागाच्या भरात स्वत:ची बीएमडब्ल्यू कार (BMW) नदीमध्ये ढकलून दिल्याची घटना गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे

अन् रागाच्या भरात तरुणानं स्वत:ची महागडी कार ढकलली नदीत
हरियाणा: हरियाणातील यमुनानगर गावातील एका युवकाने रागाच्या भरात स्वत:ची बीएमडब्ल्यू कार (BMW) नदीमध्ये ढकलून दिल्याची घटना गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनी त्या कार चालकाला ताब्यात घेतले असुन चौकशी सुरु करण्यात आली आहे.
तसेच त्या युवकाला वडिलांनी जग्वार कार घेऊन द्यायला नकार दिल्याने रागात बीएमडब्ल्यू नदीत ढकलून दिल्याचे त्याने सांगितले. त्याचसोबत पंजाब आणि हरियाण्यासारख्या राज्यांमध्ये महागड्या कारची क्रेझ असल्यामुळे मुलं कोणत्या थराला जाऊ शकतात, हे या घडलेल्या घटनेद्वारे समजते.
त्याने बीएमडब्ल्यू कार नदीत ढकलून दिल्यानंतर ती वाहत जाऊन नदीच्या मधोमध अडकल्याचे दिसते आहे. तसेच त्या युवकाचा राग शांत झाल्यानंतर ती कार पुन्हा नदीबाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करताना दिसून आला.