आनंदधामतर्फे व्यसनमुक्ती अभियान
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:05+5:302015-08-20T22:10:05+5:30
आनंदधामतर्फे व्यसनमुक्ती अभियान

आनंदधामतर्फे व्यसनमुक्ती अभियान
आ ंदधामतर्फे व्यसनमुक्ती अभियानरामटेक : परमात्मा एक आनंदधामच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात व्यसनमुक्ती अभियानाला नुकतीच सुरुवात झाली. या अभियानानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त लक्ष्मण मेहर यांच्या मार्गदर्शनात बाबा जुमदेवजी यांचा व्यसनमुक्तींचा संदेश पोहोचविला जात आहे. तालुक्यातील मनसर (कांद्री), खुमारी, दुधाळा, चारगाव व परिसरात या अभियानाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मनसर (कांद्री) येथील कार्यक्रमाला सखाराम ठाकूर, लक्ष्मण मेहर, गणेश बावनकुळे, सुनील चापले, प्रीतम मोहबिया, उमाशंकर टिकापाचे, भारती बिसेन, कौसल्या ठाकूर, अशोक मात्रे, दौलत बकाल, भोजराज लोंढे आदी उपस्थित होते. संचालन राकेश बिसने यांनी तर आभार बजरंग मेहर यांनी मानले. (प्रतिनिधी)