रेल्वे रुळांमध्ये घरटे तयार करुन आरामात बसला पक्षी, आनंद महिंद्रा फोटो शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 11:23 IST2021-11-25T11:23:15+5:302021-11-25T11:23:26+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी मजेशीर कॅप्शनही लिहीले आहे.

Anand Mahindra shared a photo of bird sat comfortably by building a nest in the railway tracks | रेल्वे रुळांमध्ये घरटे तयार करुन आरामात बसला पक्षी, आनंद महिंद्रा फोटो शेअर करत म्हणाले...

रेल्वे रुळांमध्ये घरटे तयार करुन आरामात बसला पक्षी, आनंद महिंद्रा फोटो शेअर करत म्हणाले...

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असतात. सोशल मीडिया युझर्स आनंद महिंद्रा यांच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अकाउंटवरुन एक फोट शेअर केला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. महिंद्रा यांनी ट्विट केलेला फोटो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोमध्ये एक पक्षी क्रॉस रेल्वे रुळांमध्ये आरामात बसलेला दिसत आहे. महिांद्रा यांनी या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहीले, 'एक आई, गणित, भौतिकशास्त्र आणि रेल्वे अभियांत्रिकीच्या पदवीसह. आता हिला चीफ रिस्क ऑफिसरच्या भूमिकेसाठी कॉर्पोरेशन्सकडून जगभरात मागणी आहे.' हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यावर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

लोकांना हा फोटो खूप आवडला आहे. या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज आले आहेत, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात, त्यामुळे यांनी काहीही पोस्ट केले तरी व्हायरल होतंच असतं.
 

Web Title: Anand Mahindra shared a photo of bird sat comfortably by building a nest in the railway tracks