आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:44 IST2022-08-29T18:43:20+5:302022-08-29T18:44:29+5:30
आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी झाडी दिसत आहे.

आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील?
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर प्रचंड अॅक्टिव्ह राहतात. या वर्षात त्यांचे अनेक ट्विट्स आणि पोस्ट व्हायरल झाले आहेत. त्यांनी 27 ऑगस्टला एक व्हिडिओ रीट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सुंदर झाडी दिसत आहे. महिंद्रा यांनी हा व्हिडिओ रीट्विट कर केंद्रीय रस्ते वाहतूनक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे, सध्या देशभरात जे नवीन ग्रामीण रस्ते तयार होत आहेत, त्यांच्या कडेला झाडी लावण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी झाडी दिसत आहे. दूरून पाहिल्यानंतर, हा रस्ता एखाद्या बोगद्याप्रमाणे दिसत आहे. महिंद्रा यांनी या "ट्रनेल" असे कॅप्शन दिले आहे.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ रीट्विट करत लिहिले आहे, "मला बोगदे आवडतात, पण मी अशा प्रकारच्या 'ट्रनेल' मधून जाणे पसंत करेल. नितीन गडकरी जी, "आपण आपल्या माध्यमाने तयार होत असलेल्या ग्रामीण रस्त्यांवर यांपैकी काही ट्रनेल तयार करण्याची योजना आखू शकतो?"
I like tunnels, but frankly, I’d much rather go through this kind of ‘Trunnel’ …@nitin_gadkari ji, can we plan to purposefully plant some of these trunnels on the new rural roads you are building? https://t.co/6cE4njjGGi
— anand mahindra (@anandmahindra) August 27, 2022
आतापर्यंत या व्हिडिओला 2 मिलियन पेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मंहिंद्राय यांच्या ट्विटवर लोक आपले विचारही व्यक्त करत आहेत. अधिकांश लोकांनी महिंद्रा यांच्या मागणीचे स्वागत केले आहे. एवढेच नाही, तर व्हिडिओतील दृश्य सुंदर असल्याचेही म्हटले आहे.