गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात कर्मचाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 01:44 IST2023-05-31T01:43:52+5:302023-05-31T01:44:13+5:30
प्रवाशाला दिल्ली विमानतळावर सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले.

गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात कर्मचाऱ्याला मारहाण
नवी दिल्ली : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्याला एका प्रवाशाने मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रवाशाला दिल्ली विमानतळावर सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. ही माहिती एअर इंडियाने दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत विमानामध्ये प्रवाशांनी गैरवर्तन करण्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यात आता सोमवारच्या घटनेची भर पडली आहे. गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने कर्मचाऱ्याबद्दल असभ्य भाषा वापरली. त्यानंतर मारहाण केली. हा प्रकार नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला कळविण्यात आला आहे.