शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Amritsar Train Accident : रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी असा काढला पळ, पाहा CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 11:40 IST

Amritsar Train Accident : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले.

अमृतसर : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि दुसरीकडे पोलीस रावण दहन कार्यक्रमाचा आयोजक व काँग्रेस नेत्याचे पुत्र सौरभ मदानचा शोध घेत आहेत. रेल्वे दुर्घटनेनंतर सौरभ मदान फरार झाला असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सौरभ मदान मिट्ठूच रावण दहन कार्यक्रमाचा प्रमुख आयोजक होता आणि घटनेनंतर तो फरार झाला.

एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटना स्थळ परिसराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यात अमृतसर दुर्घटनेनंतर सौरभ मदाननं गाडीत बसून पळ काढल्याचं पाहायला मिळत आहे. दुर्घटनेच्या रात्रीपासून सौरभ फरार झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जसा अपघात घडला त्याचवेळेस सौरभ मदानसहीत दोन जण रस्त्यावर पळताना दिसेल. यानंतर तेथे एक गाडी आली, यामध्ये बसून सौरभनं पळ काढला. सौरभ आपल्या संपूर्ण कुटुंबासहीत भूमिगत झाला आहे. 

(... त्यामुळे मी ट्रेन पुढे नेली, DMU रेल्वेच्या ड्रायव्हरचा लेखी जबाब)

 

दरम्यान, सौरभ मदान मिट्ठूवर रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात कित्येक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (20 ऑक्टोबर) त्यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला, दगडफेक करत घराच्या खिडक्या फोडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मदान कुटुंबीयासंहीत अज्ञात ठिकाणी गेले आहेत. त्यांनी आपला मोबाइलदेखील बंद करुन ठेवला आहे. या दुर्घटनेप्रकरणी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सौरभ मदान सध्या समोर येत नाही, असे म्हणत नागरिकांना आक्रोश व्यक्त केला आहे. 

कशी घडली दुर्घटना?

रावण दहन पाहण्यासाठी हजारो लोक चौडा बाजारात जमले होते. रावण दहनावेळी फटाके फुटू लागल्यानं त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील 300 हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळावर जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहण्यात व त्याचे मोबाइल चित्रीकरण करण्यात इतके मग्न झाले की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरुन ट्रेन येत असल्याचंही भान त्यांना राहिले नाबी. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुसऱ्या ट्रेनखाली सापडले.  

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाAccidentअपघातDeathमृत्यूcongressकाँग्रेस