शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

Amritsar Train Accident : रावण दहन आयोजकानं व्हिडीओ केला जारी, म्हणे 'माझी काय चूक?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:48 PM

Amritsar Train Accident : रेल्वे दुर्घटनेनंतर फरार असलेल्या सौरभ मदानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

अमृतसर - पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे क्षणातच आनंदी वातावरण शोकाकुल झाले होते. रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि दुसरीकडे पोलीस रावण दहन कार्यक्रमाचा आयोजक व काँग्रेस नेत्याचे पुत्र सौरभ मदानचा शोध घेत आहेत. रेल्वे दुर्घटनेनंतर सौरभ मदान फरार झाला असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडीदरम्यान, सौरभ मदान मिट्ठूचा स्वतःला निर्दोष सांगणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

(रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा)

काय म्हटलंय सौरभ मदाननं व्हिडीओमध्ये?अमृतसर रेल्वे अपघात ही खूपच दुःखद घटना आहे. या वेदनादायी घटनेमुळे मी खूप दुःखी झालो आहे. माझी सध्याची परिस्थिती मी कथनदेखील करण्याच्या अवस्थेत नाहीय. सर्वांना एकत्र आणण्यासाठी दसरा उत्सवाचं आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व परवानगीदेखील मिळल्या होत्या. पोलीस प्रशासन, अग्निशमन दलासोबत सर्व बोलणीही झाल्या होत्या. सौरभनं असेही सांगितले की, रावण दहन उत्सवाचे आयोजन आम्ही रेल्वे रुळांवर नाही तर मैदानात केले होते. मात्र काही लोक रुळावर जाऊन उभे राहिले आणि अचानक ट्रेन आली. भरधाव ट्रेन येत असल्याचे लोकांना कळण्याच्या आतच होत्याचे नव्हते झाले. ही दुर्घटना निसर्गाचा एक कहर आहे. यात माझी काय चूक?. लोकांनी रेल्वे रुळांवर उभे राहू नये, याबाबत आम्ही किमान 8 ते 10 वेळा घोषणा केली. या दुर्घटनेमुळे माझं संपूर्ण कुटुंब दुःखात आहे, असे सांगत सौरभ मदान स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.  दरम्यान, यापूर्वी घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले होते. यात अमृतसर दुर्घटनेनंतर सौरभ मदाननं गाडीत बसून पळ काढल्याचं पाहायला मिळत आहे. जसा अपघात घडला त्याचवेळेस सौरभ मदानसहीत दोन जण रस्त्यावर पळताना दिसेल. यानंतर तेथे एक गाडी आली, यामध्ये बसून सौरभनं पळ काढला.Amritsar Train Accident :  कशी घडली दुर्घटना?रावण दहन पाहण्यासाठी हजारो लोक चौडा बाजारात जमले होते. रावण दहनावेळी फटाके फुटू लागल्यानं त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील 300 हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळावर जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहण्यात व त्याचे मोबाइल चित्रीकरण करण्यात इतके मग्न झाले की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरुन ट्रेन येत असल्याचंही भान त्यांना राहिले नाबी. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुसऱ्या ट्रेनखाली सापडले. 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाPunjabपंजाबrailwayरेल्वेDeathमृत्यू