अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:54 IST2025-07-16T09:38:09+5:302025-07-16T09:54:27+5:30

जालंधरमध्ये ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांना धडक देणारा फॉर्च्युनर चालक अमृतपाल सिंग ढिल्लन याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे.

Amritpal Singh, accused in athlete Fauja Singh hit and run case, arrested Police seize Fortuner car | अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली

अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली

जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटूचा किताब पटकवणारे फौजा सिंग यांना सोमवारी एका फॉर्च्युनर कारने धडक दिली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी कारला धडक देणाऱ्या फॉर्च्युनरचा चालक अमृतपाल सिंग ढिल्लन याला अटक केली आहे. पोलिसांनी कारही जप्त केली आहे.

आरोपीने कबूल धडक दिल्याचे कबूल केले. तो अपघाताच्या वेळी कारमध्ये एकटाच होता. भोगपूरहून किशनगडला जात होता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ही कार कैद झाली होती, याच्या आधारे पोलिसांनी चौकशीनंतर त्याला अटक केली. फॉर्च्युनर (PB20-C-7100) ही बालाचौर शहरातील हरप्रीतच्या नावावर नोंदणीकृत आहे.

जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात

कारची तीन ठिकणी नोंदणी

पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून चौकशी केली. तेव्हा ती गाडी तीन ठिकाणी विकली गेल्याचे आढळून आले. एसएसपी हरविंदर सिंग विर्क यांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली.

अपघातापूर्वी लुधियानाचे निवृत्त डीएसपी देखील अपघातस्थळावरून कारमधून निघून गेले. सोमवारी पोलिसांनी डीएसपीची चौकशी केली. लिंक्स जोडून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.

३३ वर्षांपूर्वी १९९२ मध्ये, फौजा सिंग हे त्यांच्या मोठा मुलगा कुलदीपसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बियास गावातील त्यांच्या घराजवळ एक ढाबा बांधत होते. बांधकामादरम्यान, भिंतींवर पाणी टाकताना त्याचे शटरिंग कोसळले आणि या अपघातात त्यांचा मुलगा कुलदीप यांचा मृत्यू झाला.

फौजा सिंग हळूहळू त्या धक्क्यातून सावरले, परंतु त्यांनी त्यांच्या मुलाच्या आठवणीत बांधलेला तो ढाबा मिळवला आणि नंतर तो भाड्याने दिला. ढाब्याचे नाव कुलदीप वैष्णो ढाबा आहे. वयाच्या ११४ व्या वर्षीही, फौजा सिंग त्यांच्या फिरायला जाताना दररोज ढाब्यावर जात होते.

नशिबाचा खेळ पहा की सोमवारी दुपारी ३.१५ वाजता पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर एका पांढऱ्या कारने फौजा सिंग यांना धडक दिली जेव्हा ते रस्ता ओलांडून त्याच ढाब्यावर जात होते.

Web Title: Amritpal Singh, accused in athlete Fauja Singh hit and run case, arrested Police seize Fortuner car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.