हृदयद्रावक! हार्ट अटॅकने पतीचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 08:51 IST2023-05-16T08:51:03+5:302023-05-16T08:51:44+5:30

मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. याच दरम्यान, घरातील आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

amreli woman ends her life after husband death due to heart attack | हृदयद्रावक! हार्ट अटॅकने पतीचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

फोटो - आजतक

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात हार्ट अटॅकने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. याच दरम्यान, घरातील आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलाच्या अंत्ययात्रेची तयार सुरू असताना सुनेने देखील विरह सहन न झाल्याने मृत्यूला कवटाळलं. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील लिलिया गावातील आहे. येथे धवल राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुलाच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. आजूबाजूचे लोकही घरी पोहोचू लागले. याच दरम्यान, पत्नी प्रिन्सी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. 

मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने उचललेल्या या पाऊलामुळे कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण गावात खळबळ उडाली. शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले आहेत. मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. ते कसे तरी त्याला अंतिम निरोप देण्याच्या तयारीत होते. मात्र त्याच वेळी सुनेचा मृतदेह लटकलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला. परिसरात खळबळ उडाली आहे. 

पंचमहाल जिल्ह्यातील कलोल तालुक्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. व्यासदा गावात हिमांशू परमार यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती गरोदर होती. मात्र पतीच्या छळामुळे तिने जीवन संपवलं. पतीकडून होणाऱ्या रोजच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय मीनाक्षी परमार हिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी वेजलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: amreli woman ends her life after husband death due to heart attack