शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

तीन सेकंदात घरबसल्या कळणार पाण्यातील फ्लोराईडची मात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 2:23 AM

प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.

नितिन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील तब्बल १७ राज्यातील शेकडो नागरिकांना फ्लोराईडयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अस्थिव्यंगाच्या भयंकर यातनांना सामोरे जावे लागते. पाण्यातील या घातक विषारी द्रव्याची आता त्वरित शहनिशा करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.नॅनो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नॅनो विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेच्या शास्त्रज्ञाने 'लोकमत'शी बोलताना या पेपर किटबद्दल माहिती दिली. या पेपर कुठवर पाण्याचे काही थेंब टाकताच पाण्यातील फ्लोराईड आणि पेपर किटमधील रसायनांमध्ये रासायनिक प्रक्रिया घडायला सुरूवात होते. यात किटचा रंग लाल किंवा तांबूस होऊन जातो. पाण्यात फ्लोराईडची मात्रा जितकी जास्त तेव्हढ्या अधिक प्रमाणात किटचा रंग गडद व्हायला लागतो. पाण्यातील फ्लोराईडची मात्रा शोधण्याचा हा सर्वात स्वस्त आणि किफायतशीर किट असल्याचे या शास्त्रज्ञाने सांगितले. या किटचे पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाय, आतापर्यंत दोन खासगी कंपन्यांनी या किटचे व्यावसायिक उत्पादन करून ती बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलणी अद्याप सुरू आहेत.१७ राज्यांत फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्यामहाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. अशा प्रकारचे पाणी प्यायल्याने फ्लोरोसिस नावाचा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. या आजारामुळे दात खराब होतात. शिवाय, शरीरातील हाडे वाकडी झाल्याने अस्थिव्यंगातून कायमचे अपंगत्वाचाही मोठा धोका असतो. आतापर्यंत, पाण्यातील फ्लोराईडची मात्रा मोजण्याची कोणतीच साधी आणि घरच्याघरी वापरता येईल अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. या पेपर किटमुळे ही अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.>महाराष्ट्रात १५६३ ठिकाणी फ्लोराइडयुक्त पाणीनागपुरसह आसपासच्या विविध जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळून आले. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६४ आणि चंद्रपुरात ७२३ ठिकाणी फ्लोराईडयुक्त पाणी आढळून आले. याशिवाय, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही अनेक विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यात हा विषारी घटक आढळून आला आहे.>दरवर्षी हजारो कोटी पडतात खर्चीफ्लोराईडयुक्त पाण्यावर होणाºया खर्चाचा आकडा पाहिला तर या समस्येची तीव्रता तात्काळ ध्यानात येते. अलीकडेच केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २७ हजार ५४४ गावांतील पाण्यात फ्लोराईड आढळून आले आहे. फ्लोराईडने प्रभावित राज्यांना २०१६-१७ या वर्षात सुमारे चार हजार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला होता.