जीवन अन् मृत्यूशी संघर्ष करतोय, अमिताभ बच्चनची माफी मागतो- अमर सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 04:07 PM2020-02-18T16:07:28+5:302020-02-18T16:18:09+5:30

राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी मंगळवारी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांवर माफी मागितली आहे.

Amitabh Bachchan apologizes for life and death struggles - Amar Singh | जीवन अन् मृत्यूशी संघर्ष करतोय, अमिताभ बच्चनची माफी मागतो- अमर सिंह

जीवन अन् मृत्यूशी संघर्ष करतोय, अमिताभ बच्चनची माफी मागतो- अमर सिंह

Next
ठळक मुद्देमंगळवारी 18 फेब्रुवारीला अमर सिंह यांचे वडील हरिश्चंद्र सिंह यांची पुण्यतिथी होती. त्याचदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना मेसेज पाठवला. आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यासंदर्भात अमिताभ बच्चन यांचा मला संदेश मिळाला. जेव्हा मी जीवन आणि मृत्यूदरम्यान संघर्ष करत आहे, त्या वेळी मी अमिताभजी आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या टीकात्मक विधानांवर माफी मागतो.

नवी दिल्लीः राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी मंगळवारी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांवर माफी मागितली आहे. सिंह यांनी एक ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मंगळवारी 18 फेब्रुवारीला अमर सिंह यांचे वडील हरिश्चंद्र सिंह यांची पुण्यतिथी होती. त्याचदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना मेसेज पाठवला. त्यावर अमर सिंह ट्विट करत म्हणाले, आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यासंदर्भात अमिताभ बच्चन यांचा मला संदेश मिळाला. जेव्हा मी जीवन आणि मृत्यूदरम्यान संघर्ष करत आहे, त्या वेळी मी अमिताभजी आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या टीकात्मक विधानांवर माफी मागतो. ईश्वर त्या सगळ्यांना आशीर्वाद देवो.
 
अमिताभ बच्चन यांचे जवळचे मित्र राहिलेले अमर सिंह गेल्या काही वर्षांपासून अमिताभ यांच्यावर सातत्यानं टीका करत होते. अमर सिंह यांनी 2018ला अमिताभ एका व्यक्तीकडे 250 कोटी रुपये मागत असल्याचा आरोपही केला होता. महिला गुन्हेगारांसंदर्भात जया बच्चन यांनी एक भाषण दिलं होतं. त्यावर अमर सिंह यांनी पलटवार करत सांगितलं की, तुम्ही आई आहात, पत्नी आहात, आई आणि पत्नीकडे सामाजिक रिमोट असतो, तुम्ही तुमच्या पतीला का नाही म्हणत बाकीचे उद्योगधंदे बंद करा.पावसात भिजणाऱ्या नायिकांबरोबर 'आज रपट जइयो, हमें न भुलइयो न करो, असं करू नये, असं पतीला का सांगत नाही. सुनेनं जे दिल है मुश्किलमध्ये दृश्य दाखवले आहेत, ते करू नये, असं का सांगत नाही. तुम्ही तुमचा मुलगा अभिषेकला का नाही समजावत.   

Web Title: Amitabh Bachchan apologizes for life and death struggles - Amar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.