शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांच्या  पुत्रावरील आरोप भाजपाने फेटाळले, जय शाह दाखल करणार मानहानीचा खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 18:35 IST

केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीच्या उलाढालीत तब्बल 16 हजार पटीने वाढ झाल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावले आहेत.

नवी दिल्ली -  केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीच्या उलाढालीत तब्बल 16 हजार पटीने वाढ झाल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत हे आरोप  निराधार आणि प्रतिमा मलिक करण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच कंपनीच्या नफ्यात 16 हजार पटींनी वाढ झाल्याचा उल्लेख सनसनाटी वाढवण्यासाठी करण्यात आला आहे. हे वृत्त प्रसारिक करणारे संकेतस्थळ, त्याचे संपादक आणि संबंधित लेखकाविरोधात अमित शहांचा मुलगा जय शाह हे 100 कोटींचा मानहानीचा खटला आणि फौजदारी खटला दाखल करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.  द वायर या संकेतस्थळाने जय शाह यांच्या कंपनीच्या नफ्यात 16 हजार पटींनी वाढ झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अमित शाहांवर निशाणा साधला होता. 2014चं सरकार बदलल्यानंतर अमित शाह यांच्या मुलाचंही नशीब फळफळलं आहे, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला होता. सिब्बल यांच्या मते, अमित शाह यांच्या मुलाची कंपनी टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड मार्च 2013मध्ये तोट्यात होती. त्यावेळी कंपनीला 6,239 रुपयांचं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आले होते. तसेच मार्च 2014मध्येही कंपनीला 1724 रुपयांचा तोटा झाला होता. परंतु 2014-15नंतर कंपनीला मोठा फायदा झाल्याचे समोर आले. मे 2014नंतर कंपनीनं मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, त्या आर्थिक वर्षात कंपनीला 18,728 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा एकूण महसूल फक्त 50 हजार रुपये होता. मात्र खरा बदल हा 2015-16नंतर घडला आहे. 2015-16च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 80 कोटी झाली. एका वर्षात कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटीनं वाढ झाली. 2014नंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा होऊ लागला. तसेच राजीव खांडेलवाल नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या फायनान्शियल कंपनीतर्फे टेम्पल इंटरप्रायजेसला 15.78 कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. ऑक्टोबर 2016मध्ये टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद झाली. आणि कंपनी तोट्यात असल्यानं बंद केल्याची कारण सांगण्यात आले. या प्रकरणावरून कपिल सिब्बल यांनी अमित शाह यांना लक्ष्य केले. कपिल सिब्बल म्हणाले, काँग्रेसवर 10 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप जरी झाला तरी त्याच्या मागे सीबीआय व ईडीचा ससेमिरा लावतात. दीर्घकालीन भांडवलशाहीचा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो. वीरभद्र सिंह यांच्यावर किती केसेस लादण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाIndiaभारत