शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पराभवामुळे अमित शहांच्या मुलाचे लग्न साधेपणाने

By admin | Updated: February 11, 2015 10:18 IST

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लाजीरवाण्याचा पराभवाचा फटका भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला बसला.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. ११ - दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लाजीरवाण्याचा पराभवाचा फटका भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला बसला. मंगळवारी दिल्लीतील निकालाच्या दिवशीच अहमदाबादमध्ये अमित शहांच्या मुलाचे लग्न होते. या लग्नासाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र पराभवामुळे हा विवाहसोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. पराभवामुळे मुलाची वरातही काढण्यात आली नाही व लग्नाच्या ठिकाणी संगीतही बंद करण्यात आले होते. 
भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय याचा रिषिता या तरुणीसोबत मंगळवारी विवाह झाला. अहमदाबादमधील वायएमसीए संकुलात हा विवाह सोहळा पार पडला. मुलाच्या विवाहामुळे आनंदात असलेल्या शहा कुटुंबाच्या उत्साहावर दिल्लीतील पराभवाने अक्षरशः पाणी फेरले. 
अमित शहा यांच्या मुलाच्या लग्नासाठी दक्षिण भारतातून २२ ब्राह्मणांना बोलवण्यात आले होते. याशिवाय वधू व वर मांडवात प्रवेश करतील त्यावेळी संगीतही वाजवले जाणार होते. मांडवात येण्यापूर्वी जयची घोड्यावरुन वरातही काढली जाणार होती. मात्र मंगळवारी सूर्य अस्ताला जात असतानाच दिल्लीत भाजपावर लाजीरवाण्या पराभवाची नामूष्की ओढावल्याचे स्पष्ट झाले अन् विवाह सोहळ्यातील चित्रच बदलले. वरात रद्द करण्यात आली, वरातीसाठी बोलवलेला बॅंडबाजाही परत पाठवण्यात आला. विवाहाच्या ठिकाणी संगीतही बंद ठेवण्यात आले. संपूर्ण विवाह सोहळ्यात अमित शहा यांनी मौन बाळगणे पसंत केले. नातेवाईकांशी ते बोलत होते मात्र चर्चेत दिल्ली विधानसभा निवडणुकीवर भाष्य करणे त्यांनी टाळले. या विवाह सोहळ्याला राजनाथ सिंह, अरुण जेटली, राजीव प्रताप रुडी, लालकृष्ण आडवाणी, बाबा रामदेव व काही ख्यातनाम उद्योजक उपस्थित होते.  दिल्लीतील अंतिम निकाल हाती येताच अमित शहा यांनी संकुलातील बंद कम-यात राजनाथ सिंह, अरुण जेटली व राजीवप्रताप रुडी या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत  पराभवावर आणि आता काय पावले उचलावीत यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या विवाह सोहळ्याला अनुपस्थित राहणेच पसंत केले.