शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; सांगितलं- किती जागा जिंकत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 16:52 IST

अमित शाह आसाममधील दिब्रुगड येथे एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेससह राहुल गांधींवरही निशाणा साधला आणि यांचा लवकरच संपूर्ण देशातून सफाया होईल, असेही ते म्हणाले.

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर जागांचा अंदाज वर्तवत, नरेंद्र मोदी किती जागां जिंकत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमित शाह आसाममधील दिब्रुगड येथे एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेससहराहुल गांधींवरही निशाणा साधला आणि यांचा लवकरच संपूर्ण देशातून सफाया होईल, असेही ते म्हणाले. यावेळी शाह यांनी आसाममधील दिब्रुगड येथील भाजप प्रदेश कार्यालयाची पायाभरणीही केली.

शाह म्हणाले “मी काँग्रेसला सांगू इच्छितो की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवेल आणि मोदी 300 हून अधिक जागांसह पूर्ण बहुमत मिळवत तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील."

शाहंनी मांडलं हिमंता सरकारच्या कामाचं गणती -शाह यांनी मे, 2021 मध्ये हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्री झाल्यानंतर, भाजपच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारने केलेल्या कामांवर तसेच सुरू करण्यात आलेल्या योजनांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "मी 2016 मध्ये इशान्येत भाजपची विजय यात्रा सुरू केल्याबद्दल आसामच्या जनतेचे आभार मानतो. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि सहकारी या भागातील सर्वच राज्यांमध्ये सत्तेवर आहेत. तर गेल्या  काही वर्षांपूर्वी काँग्रेस हा इशान्येतील सर्वात मोठा पक्ष होता जो आता पूर्णपणे साफ झाला आहे."

'राहुल गांधींच्या आईनेही पंतप्रधान मोदींना शिव्या दिल्या, पण...' - अमित शाह पुढे म्हणाले, 'राहुल गांधींच्या आईनेही पंतप्रधान मोदींना शिव्या दिल्या, पण काहीही झाले नाही. काँग्रेसचे लोक पंतप्रधानांची कबर खोदण्याचे वक्तव्य करतात. पण, देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. ते (विरोधक) पीएम मोदींबद्दल जितके वाईट बोलत राहतील, तितकी भाजप वाढेल. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहेत,' असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस