अमित शहा यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 04:24 IST2019-09-05T04:24:45+5:302019-09-05T04:24:49+5:30

रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक अदित देसाई यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Amit Shah underwent minor surgery | अमित शहा यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया

अमित शहा यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बुधवारी येथील के. डी. रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. अमित शहा यांच्या मानेच्या मागील बाजूला असणारी एक गाठ काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक अदित देसाई यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. अमित शहा यांना आज सकाळी नऊच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मानेच्या मागील भागावर असणारी गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात आली आहे. ही लहान शस्त्रक्रिया होती आणि त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
अमित शहा कालच दिल्लीहून अहमदाबादला आले होते. ते उद्याच पुन्हा दिल्लीला परतणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Amit Shah underwent minor surgery