आज अमित शाह नाशकात

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे मंगळवारी सायंकाळी नाशकात आगमन होणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी ते उपस्थित राहणार आहेत.

Amit Shah today in Nashik | आज अमित शाह नाशकात

आज अमित शाह नाशकात

शिक : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे मंगळवारी सायंकाळी नाशकात आगमन होणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी ते उपस्थित राहणार आहेत.
अमित शाह हे मंगळवारी सायंकाळी मुंबईहून विशेष विमानाने ओझरला येतील व रात्री शासकीय विश्रामगृहावर मुक्काम करतील. त्यानंतर बुधवारी सकाळी सव्वा सात वाजता मोटारीने त्र्यंबकेश्वरकडे रवाना होतील. तेथे सव्वा आठ वाजता महायोगी गुरू गोरक्षनाथ व नवनाथ मंदिराच्या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहतील. सकाळी सव्वा दहा वाजता तपोवनातील साधुग्राममध्ये आयोजित आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्यास हजेरी लावल्यानंतर दुपारी दीड वाजता ओझरहून पुन्हा मुंबईकडे रवाना होतील. शाह यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री नाशिकला हजेरी लावणार आहेत.

Web Title: Amit Shah today in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.