शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 09:32 IST

Amit Shah : या बैठकीत आयबी आणि रॉ प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील.

नवी दिल्ली : जम्मू भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत आज गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, एनएसए अजित डोवाल, गृह सचिव, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख, एनआयएचे डीजी, सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत आयबी आणि रॉ प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील. याचबरोबर, या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी इंटिग्रेटेड प्लॅन (एकात्मिक योजना) आखला जाऊ शकतो. याशिवाय, अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्तात करण्यात येणार आहे, यासाठी या बैठकीत आवश्यक सैन्य आणि उपकरणांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच अमरनाथ यात्रेच्या मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून एआयद्वारे देखरेख केली जाणार आहे.

शुक्रवारीही झाली बैठक याआधी शुक्रवारीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी, सीआरपीएफचे उच्च अधिकारी आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दरम्यान, या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह तेथील सुरक्षेबाबत सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांत चार दहशतवादी हल्लेजम्मू-काश्मीरच्या रियासी, कठुआ आणि डोडामध्ये गेल्या चार दिवसांत चार दहशतवादी घटना घडल्या. या दहशतवादी हल्ल्यांमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला भारतीय सुरक्षा दलाचे जवान सुद्धा प्रत्युत्तर देत आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कठुआमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहAjit Dovalअजित डोवालJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला