शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:20 IST

Amit Shah on Naxalite : 'नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही.'

Amit Shah on Naxalite : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवादाचा खात्मा करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत चा अल्टीमेटम दिला आहे. या दिशेने नक्षलग्रस्त भागात तीव्र मोहिमा राबवल्या जात आहेत. दरम्यान, आता गृहमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, देशातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करणे, हे सरकारचे ध्येय आहे. या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहे.

पावसाळ्यातही मोहिमा सुरू राहणारकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे, परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही. नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील. ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही. आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. 

हिंसेचा मार्ग सोडून द्या...गृहमंत्र्यांनी छत्तीसगड सरकारच्या नवीन नक्षलवादी आत्मसमर्पण धोरणाचे कौतुक केले आणि सांगितले की, हा एक सकारात्मक पुढाकार आहे, ज्यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या विकास प्रवासात भागीदार होण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "विकसित भारत" च्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला आणि सांगितले की, हे स्वप्न केवळ पायाभूत सुविधा, नवोपक्रम आणि आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही, तर ते वेळेवर न्याय आणि सामाजिक स्थिरतेवर देखील लक्ष केंद्रित करते. नक्षलवादसारख्या समस्यांपासून भारताला मुक्त करूनच खरा विकास सुनिश्चित करता येईल.

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईलगेल्या काही वर्षांत नक्षलग्रस्त भागात पोलिस दल तैनात करणे, रस्ते आणि दळणवळणाचे जाळे वाढवणे आणि स्थानिक लोकांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे व्यापक काम करण्यात आले आहे. यामुळे नक्षलवाद्यांचा आधार कमकुवत झाला असून, अनेक भाग त्यांच्यापासून मुक्त झाले आहेत. केंद्र आणि राज्याने या एकत्रितपणे काम करत राहिल्यास नक्षलवादाचे समूळ उच्चाटन नियोजित वेळेपूर्वीच करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड