शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

अमित शहा-नितीशकुमार यांच्यात १२ जुलैला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 2:09 AM

भाजपाध्यक्ष अमित शहा आणि जनता दल यूनायटेडचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर १२ जुलै रोजी बैठक होणार आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शहा आणि जनता दल यूनायटेडचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर १२ जुलै रोजी बैठक होणार आहे. एनडीएचे घटक पक्ष जनता दल यूनायटेड, एलजेपी आणि आरएलएसपी यांच्यातील जागावाटपाच्या मुद्यावर लवकरच तोडगा निघेल, असे सांगितले जात आहे. तथापि, अन्य मुद्यांमुळे नितीशकुमार यांची काळजी वाढलेली आहे.

दोन्ही पक्षांतील मतभेद कायमभाजप नेते आणि अन्य संघटना यांच्यामुळे राज्यातील जातीय सलोखा राखण्यात अडथळे येत असल्यामुळे नितीशकुमार यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जेडीयू आणि भाजपमध्ये जागावाटप हा वादाचा प्रमुख मुद्दा आहे. २०१९ च्या निवडणुकीसाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा निकष वापरता येणार नाही. २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी होती, असे मत व्यक्त होत आहे. तथापि, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीशकुमार हे करत आहेत. मात्र, याबाबत पंतप्रधान मोदी किंवा भाजप नेतृत्व कुठलाही शब्द देत नाहीत. पाटण्यात राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी वेगवेगळे संकेत मिळत आहेत. भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य जेडीयूकडून होत असतानाच भाजप नेत्यांनी म्हटले आहे की, नितीशकुमार यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी काँगे्रससोबत जवळीक वाढविली आहे.काँग्रेसने बाळगले मौननितीशकुमार यांनी गतवर्षी नाट्यमय घडामोडीत राजदपासून दूर जाताना भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. तथापि, नितीशकुमार यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अस्वीकार्य मागण्या करुन ही परिस्थिती आणली आहे. नितीशकुमार हे भ्रष्टाचाराबाबत तडजोड करु शकत नाहीत. त्यामुळेच त्यांनी राजदची साथ सोडली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNitish Kumarनितीश कुमार