शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
3
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
4
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
5
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
6
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
8
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
9
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
10
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
11
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
12
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
13
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
14
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
15
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
16
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
17
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
18
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
19
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?

Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर अमित शहा नाराज? एनसीबीच्या मुख्यालयालाही आर्यन खान प्रकरणी ठेवले अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 10:16 AM

Sameer Wankhede in trouble Aryan Khan Drug case: भाजपचे काही नेते तीन दिवसीय परिषदेसाठी दिल्लीत हाेते. त्यावेळी शहा राज्यातील भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली. तसेच इतर सूत्रांकडूनही त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती घेतली.

- हरीश गुप्तालाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आर्यन खान ड्रग्स प्रकरण नार्काेटिक्स कन्ट्राेल ब्युराेचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने हाताळले, त्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या प्रकरणावरून अतिशय नाराज आहेत. या प्रकरणातील महत्त्वाच्या माहितीबाबत एनसीबीच्या मुख्यालयालाही अंधारात ठेवल्याचे समाेर आल्याचे सूत्रांनी गाेपनीयतेच्या अटीवर सांगितले आहे.

भाजपचे काही नेते तीन दिवसीय परिषदेसाठी दिल्लीत हाेते. त्यावेळी शहा राज्यातील भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली. तसेच इतर सूत्रांकडूनही त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले आहे. तरीही आर्यन प्रकरणाचा तपास आणि हाताळण्याच्या पद्धतीमध्ये काही चुका समाेर आल्या आहेत.  

सरकारच्या बदनामीचीही चिंताएका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले, की नार्काेटीक्स ब्युराेच्या दैनंदिन कारभारामध्ये गृहमंत्रालय हस्तक्षेप करत नाही. मात्र, संस्थेची प्रतिमा मलिन हाेणे आणि सरकारची बदनामी हाेईल, असे कृत्य करण्याची परवानगी एका अधिकाऱ्याला दिली जाऊ शकत नाही.

तपासामध्ये त्रुटीनार्काेटीक्स ब्युराेचे महासंचालक सत्यनारायण प्रधान यांनाही तपासामध्ये अनेक त्रुटी आढळल्या. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासामध्ये वानखेडे यांना माेकळीक दिली नाही.  

संवेदनशील प्रकरण विभागीय कार्यालयाने दिल्लीतील मुख्यालयाला संपूर्ण माहिती दिली नव्हती. आर्यनकडे ड्रग्स आढळले नव्हते, ही माहिती मुख्यालयाला दिलीच नसल्याचे आढळले. त्यामुळे मुख्यालयाला प्रत्येक तासाला माहिती दिली हाेती. हे प्रकरण संवेदनशील असल्याने ही माहिती गृहमंत्रालयाला देण्यात आली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहSameer Wankhedeसमीर वानखेडेAryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो