शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:33 IST

भाजपा  'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाने शानदार विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भाजपा  'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की, अमित शहा यांनी पार्टीचे अध्यक्ष पद सोडल्यास त्यांच्या जागी जेपी नड्डा यांच्याकडे पार्टीची धुरा सोपविली जाईल. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पार्टीचे अध्यक्ष अमित शहा असणार आहेत. 

देशात विविध राज्यात आगामी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपा अमित शहांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत विधानसभेसाठी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे येत्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होऊ शकते. सध्या भाजपा आपल्या सदस्यता अभियानावर भर देत आहे. 

भाजपा आपल्या अभियानामार्फत 20 टक्के सदस्य वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यानंतर भाजपा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे. भाजपा खासदार भूपेंद्र यादव यांना पार्टीचे अध्यक्ष कोण होणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की, 'सदस्यता अभियान पूर्ण झाल्यानंतर पार्टीची संघटनात्मक निवडणूक केली जाईल.'

दरम्यान, महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या तिन्ही राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही राज्यात पुन्हा सरकार आण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अमित शहा हेच भाजपाचे अध्यक्ष असावेत, असे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पार्टीचे कार्यकर्त्यांना वाटत आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा