शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah : "ममता बॅनर्जींनी बंगालला दलदलीत ढकललं"; अमित शाह कडाडले, मोठ्या योजनांची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 08:56 IST

Amit Shah And Mamata Banerjee : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण २४ परगणा येथील मथुरापूर येथे एका  जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ममता यांनी बंगालला दलदलीत ढकललं असं म्हणत निशाणा साधला. तसेच गृहमंत्र्यांनी यावेळी राज्यात अनेक नवीन मोठ्या योजनांची घोषणाही केली.

जनसभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, "बंगालने खूप काही सोसलं आहेत. अनेक वर्षांपूर्वी बंगालला उद्ध्वस्त केलं होतं. एकेकाळी बंगाल हे एक समृद्ध आणि आनंदी राज्य होतं. ममता दीदींनी या राज्याला गरिबीच्या दलदलीत ढकललं. आता रवींद्रनाथ टागोर यांचं 'सोनार बांग्ला' स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे." 

"TMC ला मत देऊन चूक केली तर..."

गृहमंत्री पुढे म्हणाले, "ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या 'सोनार बांग्ला'बनवू शकतात का? मी बंगालच्या जनतेला हे सांगायला आलो आहे की, जर यावेळी तुम्ही TMC ला मत देऊन चूक केली, तर इथे ममता दीदींचं नाही, तर पुतण्याचं राज्य चालेल."

"घुसखोरांना बाहेर काढलं जाईल"

अमित शाह यांनी ममतांच्या पक्षावर बंगालमध्ये घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला. TMC ने बंगालला घुसखोरांसाठी सुरक्षित ठिकाण बनवलं आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरांना बाहेर काढलं जाईल आणि सीमावर्ती राज्याची सुरक्षा मजबूत केली जाईल, असंही शाह यांनी ठामपणे सांगितलं. 

गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणा

गृहमंत्र्यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यात अनेक घोषणा केल्या आहेत. भाजपा सत्तेत आल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार आणि प्रलंबित आर्थिक लाभ दिले जातील. २६ डिसेंबर २०२५ पासून सर्व रिक्त सरकारी पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. भरती परीक्षेत तरुणांना ५ वर्षांची विशेष वयोमर्यादा सवलत दिली जाईल.

भरती घोटाळ्यांना चाप लावण्यासाठी पारदर्शक यंत्रणा राबवली जाईल. भ्रष्टाचाराविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण, घुसखोरीवर बंदी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत केली जाईल. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी ५,७०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केली जाईल असं म्हटलं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Shah slams Mamata, unveils Bengal development 'masterplan'.

Web Summary : Amit Shah criticized Mamata Banerjee for pushing Bengal into poverty. He promised development, state government employee pay raises, job openings, and stronger border security under BJP rule. He accused TMC of sheltering infiltrators.
टॅग्स :Amit Shahअमित शाहMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणTrinamool Congressतृणमूल काँग्रेस