शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

अमित शाहांनी भाजपा नेत्यांना दिला उत्तर प्रदेशात 74+ जागा जिंकण्याचा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 07:43 IST

2019च्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, त्याप्रमाणेच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

लखनऊः 2019च्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, त्याप्रमाणेच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्षअमित शाह काल उत्तर प्रदेशमध्ये आले होते. भाजपाच्याउत्तर प्रदेशातील कार्यसमितीच्या बैठकीत अमित शाहांनी कार्यकर्त्यांना 74+ जागा जिंकण्याचा मंत्र दिला आहे. उत्तर प्रदेशातील नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं होतं.ते म्हणाले, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 74+ जागा जिंकून भाजपा नव्या विजयाची नोंद करणार आहे. तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अपना दलाबरोबर युती करत उत्तर प्रदेशमध्ये 73 जागा जिंकल्या होत्या. अमित शाह यांनी महागठबंधनाशी दोन हात करण्याची जबाबदारी भाजपाच्या नेत्यांवर सोडली आहे. महागठबंधन हे भाजपासाठी आव्हान नाही. तुम्ही फक्त मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारच्या योजना घराघरात घेऊन जा. तुम्ही गल्लीबोळातील लोकांच्या घरी जाऊन या योजनांबद्दल जनजागृती करा, तुम्ही डोंगरासारखे उभे राहिलात, तर भाजपाचा विजय निश्चित आहे, असंही अमित शाह कार्यकर्त्यांना संबोधून म्हणाले आहेत.

(देशात मुदतीआधी लोकसभा निवडणूक होणार नाही- अमित शहा)

(बांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची व्होटबँक; ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शहा यांची जोरदार टीका)

भाजपा मतांच्या ध्रुवीकरणाचं नव्हे, तर विकासाचं राजकारण करणार आहे. पुढची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल. त्याच दरम्यान त्यांनी लोकसभेच्या 74+ जागा जिंकण्याचा मानस बोलून दाखवला. लोक म्हणतात, सपा-बसपा एकत्र आले आहेत, तर भाजपाचं काय होईल ?, त्याला प्रत्युत्तर देताना अमित शाह म्हणाले, उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि काँग्रेससह सर्वांना आम्ही एकदा पराभवाची धूळ चारली आहे. जेव्हा 2017ची निवडणूक लढलो होतो, तेव्हा दोन मुलांनी हातमिळवणी केली होती. त्याच वेळी आम्ही उत्तर प्रदेशात 300हून अधिक विधानसभेच्या जागा जिंकलो. यावेळीसुद्धा तिघांनीही आघाडी केली तरी आम्ही लोकसभेच्या 74 जाग जिंकूच, असंही विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradeshउत्तर प्रदेशAmit Shahअमित शाहBJPभाजपा