शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

नापास नेत्यांची विदेशात लेक्चरबाजी - अमित शाहंची राहुल गांधींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 12:43 PM

राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले

ठळक मुद्देकोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढलेनरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला

नवी दिल्ली, दि. 13 - राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले आणि हा राहुल गांधींचा संदर्भ असल्याचे स्पष्ट झाले. कोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढले आहेत.राहुल गांधींनी कॅलिफोर्नियातील बर्कले या विद्यापीठात काल भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच भाजपावर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर भाजपा व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. देशामध्ये हिंसा, चीड आणि ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू असून असं वातावरण भारतात तयार करण्यासाठी केंद्र सरकारला राहुल गांधींनी जबाबदार धरले. भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर या नव्या बदलासाठी राहुल गांधींनी ठपका ठेवला आहे. नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.राहुल गांधींच्या मताशी असहमती दर्शवताना अमित शाह यांनी काँग्रेसप्रणीत युपीए पेक्षा विद्यमान सरकारची कामगिरी सरस असल्याचा दावा केला आहे. कार्यक्षमता हा या सरकारचा मुख्य पाया असल्याचे शाह म्हणाले. काँग्रेसच्या काळात असलेले घराणेशाहीचे राजकारण भाजपाने संपवल्याचा दावाही शाह यांनी केला. तसेच एकगठ्ठा मतांसाठी लांगुलचालन करण्याच्या धोरणाचा भाजपा स्वीकार करत नसल्याचेही शाह म्हणाले. राजकीय कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असून घराणेशाही मान्य नसल्याचे शाह यांनी सांगितले.

वाचा राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 मुद्देः

1. हिंसेमुळे कुणाचंही भलं होणार नाही2. नोटाबंदीसंदर्भात संसदेचा सल्ला घेतला नाही3. सत्तेत असताना अहंकार नसावा 4. मोदी सरकारनं RTI चे केले नुकसान5. भारतात आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. देशाला आता रोजगार निर्माण करायला हवा. 6. BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत7. सगळी पॉवर आहे पीएमओकडे8. भाजपाचा होता कम्प्युटरला विरोध 9. काश्मीरमधील दहशतवाद आम्ही कमी केला, मात्र भाषणं नाही केलीत10. भाजपाप्रमाणे काँग्रेसला वरिष्ठांचा विसर नाही

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह