शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार 'पलटू बाबू', PM मोदींमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झाला; अमित शहा कडाडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 17:30 IST

Amit Shah Bihar Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बिहारमधून नितीश कुमार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Amit Shah Bihar Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बिहारच्या लखीसरायमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. नितीश कुमारांचे 'पलटू बाबू' असे वर्णन करत शहा म्हणाले की, नितीश कुमार पंतप्रधान मोदींमुळेच बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यासोबतच शहांनी केंद्र सरकारचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षातील कामांची माहिती दिली. 

शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारताला अभिमानाची 9 वर्षे दिली आहेत. ते 9 वर्षांपासून देशातील गरिबांसाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लोककल्याणकारी योजनांचा लाभ देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर म्हणाले की, त्यांना इतर देशांतून मिळत असलेला आदर हा भाजप किंवा पीएम मोदींचा आदर नसून संपूर्ण देशाचा आदर आहे.

ते पुढे म्हणाले की, पलटू बाबू नितीश कुमार म्हणतात की, मोदींनी 9 वर्षात काय केले? अहो नितीश कुमार, ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, किमान त्यांचा तरी विचार करा. मोदींची 9 वर्षे गरीबांसाठी आणि भारताच्या सुरक्षेसाठी होती. मी हिशोब देण्यासाठी आलो आहे. नळांद्वारे गरिबांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले. गरिबांच्या घरापर्यंत सर्व सुविधा देण्याचे काम मोदी सरकारने केले. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर गेले तरी मोदी-मोदीचा नारा घुमतो.

पंतप्रधान मोदींनी ते केले आहे, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद संपवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवले. 9 वर्षात देशाला सर्व बाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे कामही मोदींनी केले, असंही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेस