शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

2019ची लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखी, कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 09:17 IST

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

ठळक मुद्दे जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे.

नवी दिल्ली- भाजपाध्यक्षअमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. भाजपामध्ये जो काहीही मागतो त्याला काहीही मिळत नाही. परंतु जो काहीच मागत नाही, त्याल घरबसल्या सर्वकाही मिळतं, असं अमित शाह म्हणाले आहेत. 100 वर्षांपासून हा पक्ष असाच चालत आला आहे. 2019च्या लोकसभेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण आहे.देशाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्यानं ती एखाद्या युद्धासारखी लढली जाईल, काही युद्ध असे असतात ते युग परिवर्तन घडवून आणतात. 2019च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचं युग परिवर्तन होणार आहे. या युद्धात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता आहे. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढत भाजपाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच आहे, असंही शाह यांनी कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलं आहे.2019ची लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांवर लढवली जाणार आहे. जर पानिपतचं युद्ध आपण हरलो नसतो, तर इंग्रजांनीही आपल्यावर राज्य केलं नसतं. 2019ची निवडणूकही पानिपतच्या युद्धासारखी आहे. आज भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र झाले आहेत, परंतु आम्ही विरोधकांना घाबरत नाही, असंही ते म्हणाले आहेत.  पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यामुळे आपल्याला 200 वर्षं गुलामगिरीत घालवावी लागली. 2019ची निवडणूक जर भाजपानं जिंकली, तर 50 वर्षं खासदारापासून ते पंचायतीपर्यंत भाजपाचं शासन राहील, असंही शाह म्हणाले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शाहBJPभाजपा