अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:10 IST2025-08-23T19:51:40+5:302025-08-23T20:10:03+5:30

या सायबर घोटाळ्यात सहभागी असलेल्या प्रमुख व्यक्तींचे जबाब ईडीने नोंदवले आहेत. याव्यतिरिक्त, आरोपींशी जोडलेली ३० बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

American citizens were duped of Rs 130 crore, ED exposes fake call center; 8 luxury cars seized | अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त

अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त

ईडीने एका बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. या सेंटरवरुन नागरिकांची सायबर फसवणूक केल्याचे समोर आले. इंटरनेटशी संबंधित फसवणुकीमुळे अमेरिकेला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, याचा मोठा भाग भारतस्थित कॉल सेंटरशी जोडलेला आहे. ईडीने गुरुग्राम झोनल ऑफिस टीमने एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यापूर्वी पुण्यातही अशीच कारवाई करण्यात आली होती.

आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

तपास यंत्रणेने बुधवारी गुरुग्राम आणि नवी दिल्लीतील सात ठिकाणी छापे टाकले आणि कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंगशी संबंधित महत्त्वाचे पुरावे जप्त केले. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी मिळून २-३ वर्षांत अमेरिकन नागरिकांची १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (१३० कोटी रुपयांपेक्षा जास्त) फसवणूक केली.

अर्जुन गुलाटी, दिव्यांश गोयल आणि अभिनव कालरा हे तीन तरुण नोएडा आणि गुरुग्राममध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर चालवत होते. हे कॉल सेंटर प्रामुख्याने तांत्रिक मदतीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करत होते. आरोपी पीडितांच्या बँक खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करून परदेशी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करत असत आणि नंतर गुंतागुंतीच्या व्यवहारांद्वारे त्या रकमा भारतात परत आणत होते, असं ईडीच्या तपासात समोर आले.

१३० कोटी रुपयांची फसवणूक

नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान, या टोळीने सुमारे १३० कोटींची फसवणूक केली. आतापर्यंत तपासात २०० हून अधिक बँक खात्यांबद्दल माहिती समोर आली आहे. ही मनी लाँड्रिंगसाठी वापरली गेली. छाप्यादरम्यान, एजन्सीने अनेक महत्त्वाचे डिजिटल रेकॉर्ड आणि कागदपत्रे जप्त केले. तसेच, ३० बँक खाती गोठवण्यात आली, आठ आलिशान कार आणि महागड्या घड्याळे जप्त करण्यात आली. आरोपी आलिशान घरात राहत होते आणि त्यांनी बेकायदेशीर कमाईतून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता मिळवली होती, अशी माहिती ईडीने दिली.

सीबीआय, आयओडी दिल्लीने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू झाला. एफआयआरमध्ये, अज्ञात आरोपींवर भारतीय दंड संहिता, १८६० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून टेक सपोर्ट घोटाळ्यांद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.

Web Title: American citizens were duped of Rs 130 crore, ED exposes fake call center; 8 luxury cars seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.