अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:29 IST2025-09-15T18:28:46+5:302025-09-15T18:29:22+5:30
America Tariff War Against India: मांसाहारी दूध आणि शेतीची उत्पादने भारतात विकण्याचा अमेरिकेचा डाव आहे. त्यावर भारत अडून राहिला आहे. काही केल्या भारत नमत नाहीय हे पाहून ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टेरिफ आणि दंड लादला आहे.

अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
भारताला टेबलवर चर्चेला यावेच लागणार म्हणणारी अमेरिकाचभारतात येत आहे. अमेरिकेचे अधिकारी भारताच्या वाटेवर असून आज ते पोहोचणार आहेत. ऑगस्टमध्ये थांबलेली चर्चा आता पुन्हा सुरु करायची आहे. अमेरिकेत महागाई उच्चांकावर आहे, नोकऱ्या जात आहेत. ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड रोष आहे. अशातच ट्रम्प यांच्या समर्थकाला गोळ्या घालण्यात आल्याने आता ट्रम्प यांना पुरते कळून चुकले आहे.
मांसाहारी दूध आणि शेतीची उत्पादने भारतात विकण्याचा अमेरिकेचा डाव आहे. त्यावर भारत अडून राहिला आहे. काही केल्या भारत नमत नाहीय हे पाहून ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टेरिफ आणि दंड लादला आहे. एवढे करूनही भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आता अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून आता ट्रम्प समर्थकांना आपल्या जिवाचा धोका वाटू लागला आहे. एकेक करून आपल्यालाही आता अमेरिकी लोक उडवतील का काय अशा भितीने ट्रम्प समर्थकांची गाळण उडाली आहे. यामुळे ट्रम्पच आता चर्चेच्या टेबलवर येत आहेत.
अमेरिकेचे व्यापारावरील चर्चा प्रमुख ब्रेंडन लिंच हे एका दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री ते दिल्लीत पोहोचणार आहेत. मंगळवारी ते भारतीय समकक्ष सचिव राजेश अग्रवाल यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेचे भारतासोबत चर्चेसाठी बनविण्यात आलेली समिती देखील आहे. भारत-अमेरिका व्यापार करारातील अडचणी सोडवण्यासाठी अमेरिकन पथकाचा दौरा २५ ते २९ ऑगस्ट दरम्यान नियोजित होता, परंतु रशियन तेल आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीवरून अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लादल्यानंतर वाढलेल्या तणावामुळे तो रद्द करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा आपला मित्र म्हणून संबोधित केले होते. यामुळे पुन्हा अमेरिका-भारत चर्चा सुरु होण्याचे संकेत दिसत होते.