'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:27 IST2025-09-07T14:26:58+5:302025-09-07T14:27:24+5:30
Arvind Kejriwal: आप प्रमुख अरविंद केजरीवाल सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.

'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी अहमदाबाद-राजकोट महामार्गावरील प्रभू फार्म येथे माध्यमांशी संवाद साधला. केजरीवाल बऱ्याच काळापासून कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यास विरोध करत आहेत. यावेळी त्यांनी कापूस शेतकऱ्यांसाठी चार मागण्याही मांडल्या. तसेच, अमेरिकेने लादलेल्या शुल्कावर भारत सरकारने दिलेल्या प्रतिसादावरही भाष्य केले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प भित्रे आहेत. ज्या देशाने त्यांना आव्हान देण्याचे धाडस केले, त्यांना नमते घ्यावे लागेल. यावेळी केजरीवालांनी केंद्र सरकारला आवाहन केले की, जर अमेरिका ५० टक्के शुल्क लादत असेल, तर भारताने त्यांच्यावर ७५ टक्के शुल्क लादावे. संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत.
केजरीवाल पुढे म्हणाले की, पूर्वी कापूस १५०० रुपये किमतीने विकला जायचा. आज एका शेतकऱ्याला १२०० रुपये मिळतात. बियाण्यांची किंमत वाढली आहे, मजुरी वाढली आहे, पण शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय. आता जर अमेरिकेतून भारतात कापूस आयात केला, तर स्थानिक शेतकऱ्यांची किंमत आणखी कमी होईल.
केजरीवालांच्या चार मागण्या
अमेरिकेतून कापसाच्या आयातीवरील ११ टक्के शुल्क रद्द करण्यात आले, ते पुन्हा सुरू करावे.
कापूस शेतकऱ्यांना २१०० रुपये प्रति मनु दराने किमान आधारभूत किंमत द्यावी.
शेतकऱ्यांचे पीक किमान आधारभूत किमतीने खरेदी करावे.
बियाण्यांसह शेतकऱ्यांच्या सर्व गरजांवर अनुदान द्यावे आणि ते शेतकऱ्यांसाठी स्वस्त करावे.