अंबाबाईचा आजपासून किरणोत्सव
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
कोल्हापूर : स्थापत्य आणि खगोलशास्त्राचा उत्कृष्ट मंदिराचा नमुना असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारपासून किरणोत्सव सुरू होत आहे.

अंबाबाईचा आजपासून किरणोत्सव
क ल्हापूर : स्थापत्य आणि खगोलशास्त्राचा उत्कृष्ट मंदिराचा नमुना असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारपासून किरणोत्सव सुरू होत आहे.नोव्हेंबर महिन्यात निराशा झाल्याने यंदा तरी किरणोत्सव पूर्ण होईल का, याबद्दल भाविकांमध्ये उत्सुकता आहे. श्री अंबाबाईचा वर्षातून दोन वेळा किरणोत्सव होतो. नोव्हेंबर महिन्यातील ९, १०, ११, तर ३१ जानेवारी आणि १ व २ फेबु्रवारी अशा किरणोत्सवाच्या तारखा आहेत. सूर्यकिरणे पहिल्या दिवशी श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या चरणांपर्यंत, दुसर्या दिवशी कमरेपर्यंत आणि अखेरच्या दिवशी मूर्तीच्या मुखावर किरणे पडून किरणोत्सव पूर्ण होतो. नोव्हेंबर महिन्यात किरणांनी केवळ एक दिवस देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला होता. (प्रतिनिधी)