अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 05:49 IST2026-04-13T05:49:33+5:302026-04-13T05:49:59+5:30
Amarnath Yatra: दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध अमरनाथ गुफा मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा यावर्षी ३ जुलैपासून सुरू होणार असून ती ५७ दिवसांच्या कालावधीनंतर २८ ऑगस्ट रोजी संपन्न होईल.

अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
जम्मू : दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध अमरनाथ गुफा मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा यावर्षी ३ जुलैपासून सुरू होणार असून ती ५७ दिवसांच्या कालावधीनंतर २८ ऑगस्ट रोजी संपन्न होईल. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी या यात्रेच्या नियोजनाची घोषणा केली.
यात्रेसाठी भाविकांची नोंदणी १५ एप्रिलपासून सुरू होणार असून, देशभरातील ५५६ बँक शाखांमध्ये तसेच श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.