शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

भाविकांसाठी खुशखबर; लवकरच तयार होणार अमरनाथचा रस्ता, 8 ते 9 तासांत पूर्ण होणार यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 7:24 PM

बीआरओने हाती घेतले अशक्य काम, 3 दिवसांची अमरनाथ यात्रा 8 ते 9 तासांत पूर्ण होणार.

Amarnath Road Project: अमरनाथ यांत्रेकरुंसाठी खुशखबर आहे. श्री अमरनाथच्या पवित्र गुंहेपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3888 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथच्या पवित्र गुहेकडे जाणारा रस्ता लवकरच तयार होणार आहे. 5300 कोटी रुपये खर्चुन हा रस्ता बांधला जात आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर दरड कोसळणे, यासारख्या आव्हानांपासून भाविकांची मुक्तता होणार आहे, यासोबतच तीन दिवसीय अमरनाथ यात्रा 8-9 तासात मध्ये पूर्ण होणार आहे. 

या कठीण कामात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ)चीही मदत घेतली जात आहे. यासोबतच पर्वत रेंज प्रकल्पांतर्गत बालटाल ते पवित्र गुहा असा नऊ किलोमीटर लांबीचा रोपवे 750 कोटी रुपयांमध्ये बांधण्याचीही योजना आहे. त्याचा डीपीआरही पुढील महिन्यापर्यंत तयार होईल. या मोहिमेत BRO पहलगामसह बालटालच्या दोन्ही किनाऱ्यांवरील पवित्र गुहेचे मार्ग रुंद करण्याचे काम करत आहे. हा प्रकल्प त्वरीत पूर्ण करण्यासाठी बीआरओचे ट्रक आणि लहान पिकअप वाहने पवित्र गुहेपर्यंत पोहोचली आहेत. 

शेषनाग आणि पंचतरणी दरम्यान 10.8 किमी लांबीचा बोगदाचंदनबारी ते पवित्र गुहेपर्यंतच्या मार्गावर शेषनाग ते पंचतरणी दरम्यान 10.8 किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे, जेणेकरून यात्रेकरूंना खराब हवामानात सुरक्षित आणि अखंड प्रवास करता येईल. याशिवाय पंचतर्णी ते पवित्र गुहेपर्यंत 5 किलोमीटर लांबीचा आणि साडेपाच मीटर रुंद पक्का रस्तादेखील तयार करण्यात येत आहे.

बालटाल विभागाच्या कामालाही वेग आला बालटाल मार्गाच्या या भागावरदेखील काम सुरू आहे, जे गुहेपर्यंत सुमारे 14 किलोमीटर लांब आहे. या कामाची जबाबदारी गेल्या वर्षी बीआरओकडे सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचे अनेक भागही पूर्ण झाले आहेत, विशेषत: भूस्खलन प्रवण भागात टेकड्यांवर भिंती बांधल्या जात आहेत. अमरनाथ यात्रा मार्गासाठी चिनूक हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वात आधी अवजड यंत्रसामग्री नेण्यात आली. संपूर्ण मार्गावर डोझर, रॉक ब्रेकर्स आणि ट्रॅक्टर तैनात करण्यात आले आहेत. लवकरच याचे काम पूर्ण होईल, जेणेकरुन भाविकांना वाहनातून गुहेपर्यंत पोहोचतील. 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीर