Amarnath Yatra: बलाटल मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 23:58 IST2018-07-03T23:58:11+5:302018-07-03T23:58:33+5:30

Amarnath Yatra: Five dead, three injured in a landslide near Brarimarg on Baltal route | Amarnath Yatra: बलाटल मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू 

Amarnath Yatra: बलाटल मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू 

जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ यात्रेच्या बलाटल मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील बालटाल मार्गावर रेलपत्रा आणि बरारीमार्गा दरम्यान ही दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एक महिला यात्रेकरुचा समावेश आहे, अशी माहिती येथील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, घटनास्थळी बचाव दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. 




यंदाच्या वर्षी यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.



 

Web Title: Amarnath Yatra: Five dead, three injured in a landslide near Brarimarg on Baltal route