शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ पूजेचे दूरदर्शनतर्फे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, जुलैमध्ये यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 03:46 IST

अमरनाथच्या गुंफेत दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास करण्यात येणाऱ्या पूजेचे भाविकांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी श्री अमरनाथजी देवस्थान मंडळाने दूरदर्शनकडे केली आहे.

श्रीनगर : अमरनाथ यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असून कोरोनाच्या साथीमुळे मोठ्या संख्येने यात्रेकरूंना सहभागी होण्यास परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे अमरनाथच्या गुंफेत दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास करण्यात येणाऱ्या पूजेचे भाविकांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी श्री अमरनाथजी देवस्थान मंडळाने दूरदर्शनकडे केली आहे.हे प्रक्षेपण डीडी राष्ट्रीय व कामीरच्या डीडी कशीर या दोन वाहिन्यावर करण्यात यावे असेही या मंडळाने म्हटले आहे. श्रीनगर दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे प्रमुख जी. डी. ताहिर यांनी सांगितले की, श्री अमरनाथजी देवस्थान मंडळाची मागणी मान्य झाली तर अमरनाथ गुंफेतील पूजेचे थेट प्रक्षेपण होण्याचा तो पहिलाच प्रसंग असेल. अमरनाथ यात्रेच्या वेळी चित्रित केलेले कार्यक्रम याआधीही दूरदर्शनवरून दाखविण्यात आले होते. मात्र या यात्रेतील प्रसंगांचे व पूजेचे थेट प्रक्षेपण आजवर कधीही झालेले नाही. >कमी दिवसांची यात्रा?कोरोनाच्या साथीमुळे यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा अगदी थोडक्या दिवसांसाठी असावी, असा विचार सरकार करीत आहे. ही यात्रा २१ जुलैपासून सुरू होऊन आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्याबाबत सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही.