शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

विमान प्रवास महागणार; सुस्साट अन् पॉवरबाज 'बोइंग ७३७ मॅक्स'वरील बंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:10 IST

भारतानं इथोपियन विमान दुर्घटनेनंतर रात्रभरात बोइंग 737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घातली आहे.

नवी दिल्ली- भारतानं इथोपियन विमान दुर्घटनेनंतर रात्रभरात बोइंग 737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घातली आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बोइंग विमानांच्या सर्व सेवा खंडित करण्यात येणार आहेत. भारतानं या विमानांवर बंदी आणल्यानं त्याचा सरळ सरळ स्पाइस जेट, जेट एअरवेजवर प्रभाव पडणार आहे. स्पाइस जेटकडे जवळपास 12, तर जेट एअरवेजकडे जवळपास 5 बोइंग विमानं आहेत. या बंदीचा परिणाम इतर विमानांच्या उड्डाणांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पाइस जेटनं यासंदर्भात प्रवाशांना काही सूचनाही केल्या आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतीय विमान कंपन्यांना वेळोवेळी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच आता बोइंगची विमानं बंद केल्यानं विमानांचे तिकीटदर भडकण्याची चिन्हे आहेत. जेट एअरवेजची 54 विमानं नादुरुस्तजेट एअरवेजच्या 119 विमानांपैकी 54 विमान आता कार्यरत नाहीत. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी अबूधाबीची विमान कंपनी असलेल्या एतिहादकडून या संकटांशी दोन हात करण्यासाठी 750 कोटींची मागणी केली आहे. एतिहादची जेट एअरवेजशी भागीदारी आहे. इंडिगो आणि गो एअरही संकटातइंडिगोमध्ये वैमानिकांची कमी आहे. त्यामुळेच कंपनीनं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच काही दिवस दररोज 30 उड्डाणं रद्द करण्याची घोषणा केली आहे. गो एअरनंही त्यांच्या काही विमानांची सेवा खंडित केली आहे. AIची 23 विमानं नादुरुस्तसरकारी विमान कंपनी एअर इंडियाची जवळपास 23 विमानं तांत्रिक कारणास्तव उड्डाण भरण्यास सक्षम नाहीत. निधीच्या कमतरतेचा सामना करणारी एअर इंडिया या विमानांची इंजिन खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीला विश्वास आहे की, नवी इंजिन खरेदी केल्यास दिल्लीतील उडालेलं विमान थेट लॉस एन्जिलिसला जाईल.  केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू घेणार बैठककेंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभूही यासंदर्भात एक बैठक घेणार आहेत. त्यांनाही विमानांच्या तिकिटांचे दर भडकण्याची भीती सतावते आहे. बोइंगची मॅक्स विमानं का आहेत विशेष ?बोइंगच्या 737 मॅक्स विमानांमध्ये नव्या डिझाइनच्या पंख्यांचा वापर केला गेला आहे. तसेच या विमानांना उड्डाणांसाठी कमी इंधन लागते. प्रवाशांना बसण्यासाठी ही विमानं सुटसुटीत आहेत. या विमानांमध्ये बसल्यावर जास्त धक्के जाणवत नाहीत. बोइंगची ही विमानं वैमानिकांनाही चांगली सुविधा देतात. बोइंगच्या विमानात नव्या डिस्प्लेच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच 15 इंचाची मोठी स्क्रीन बसवण्यात आली असून, त्यातून वैमानिकांना कमी मेहनतीत जास्त सूचना मिळतात. या विमानातील इंजिन पर्यावरणपूरक असून, विषारी गॅसचं कमी उत्सर्जन होतं. बोइंगच्या विमानांत सॉफ्टवेअर समस्येचा अभाव आहे. तसेच जगभरात मोजक्याच वैमानिकांना ही विमानं चालवता येतात. 

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेजspicejetस्पाइस जेट