लव्ह जिहाद प्रकरणात जोधा-अकबरची एंट्री; लग्नासाठी धर्मांतराची गरज नाही-हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:12 IST2021-08-03T18:12:20+5:302021-08-03T18:12:25+5:30
Allahabad High Court on Love Jihad: लव जिहादसंबंधी एका प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टने अकबर आणि जोधाबाई यांचे उदाहरण दिले.

लव्ह जिहाद प्रकरणात जोधा-अकबरची एंट्री; लग्नासाठी धर्मांतराची गरज नाही-हायकोर्ट
अलाबाबाद: उत्तर प्रदेशात वाढत असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणात आता मुघल सम्राट अकबर आणि त्यांची हिंदू पत्नी जोधाबाई यांची एंट्री झाली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या एका निर्णयादरम्यान या दोघांची एंट्री झाली. हायकोर्टात एटा जिल्ह्यातील लग्नासाठी बळजबरीने धर्मांतर केल्याप्रकरणाची सुनावणी सुरू होती. या खटल्याचा निर्णय देताना अकबर आणि जोधाबाई यांच्या नात्याला उदाहरण म्हणून सादर करण्यात आले.
कोर्टाने म्हटले की, फक्त लग्न करण्यासाठी बळजबरीने धर्णांतर करणे अयोग्य आहे. अशा धर्मांतमध्ये पुजा करण्याची पद्धत बदलते, पण मनात त्या धर्मातील देवाबद्दल आस्था निर्माण होत नाही. अशा धर्मांतरामुळे त्या व्यक्तीसह समाज आणि देशावर वाईट परिणाम पडतो. कोर्टाने आपला निर्णय देताना धर्मांतराला चुकीचे म्हटले असून, लग्न करण्यासाठी धर्मांतर करण्याची गरज नसल्याचं मतही व्यक्त केलंय.
एटा जिल्ह्यातील जावेदच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले की, धर्म आस्थेशी संबंधित विषय आहे. इश्वराबद्दल आस्था असण्यासाठी एखाद्या विशिष्ट धर्माच्या पुजेच्या पद्धतीची गरज नाही. लग्नासाठी मुलगा आणि मुलगी एकाच धर्माचे असणे गरजेचे नाही. तसेच, फक्त लग्न करण्यासाठी बळजबरीने धर्म परिवर्तन करणेही चुकीचे आहे. एकमेकांच्या धर्माचा आणि आस्थेचा सन्मान करुनही नाते जपता येतात असे म्हणत कोर्टाने मुघल बादशाह अकबर आणि त्यांची हिंदू पत्नी जोधाबाई यांच्याकडे उदाहरण दिले.
बळजबरी लग्न केल्याचा आरोप
जस्टिस शेखर यादव यांनी एटातील रहिवासी जावेदच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी केली. जावेदने एका हिंदू मुलीला आपल्या बोलण्यात अडकवून तिच्याशी लग्न केलं होतं. लग्न झाल्यावर तिचे धर्मांतर केले आणि परत मुस्लिम पद्धतीने तिच्याशी निकाह केला. याप्रकरणी त्या तरुणीने न्यायाधशींसमोर आपली बाजू मांडली आणि बळजबरीने उर्दुमध्ये लिहीलेल्या कागदावर सही करुन घेतल्याचा आरोपही केला. यानंतरर कोर्टाने जावेदचा जामीन अर्ज फेटाळला.